Coronavirus : आतापर्यंत ST महामंडळातील 600 कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा तर मार्चअखेर पर्यंत 138 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा कोरोनाने विळखा घातला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संकटाने वेधले आहे. या मागील दोन आठवड्यामध्ये जवळपास ६०० एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सोमवारी आणखी ६८ रुग्ण बाधित आढळून आले. तर आज अखेर मृत्यूचा आकडा १३८ इतका झाला आहे.

कोरोना कहर एसटी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. जादा कोरोनाबाधित रुग्ण हे एप्रिल महिन्यापासून वाढत आहेत. तर नाशिकमध्ये १८ आणि उस्मानाबादमध्ये १७ जण आढळून आले आहे. कर्मचाऱ्यांची बाधित रुग्णसंख्या ५७३९ इतकी झाली आहे. तर ४७९४ जणांची कोरोनापासून सुटका झाली आहे. तसेच आता उपचारित ८०७ कर्मचारी-अधिकारी आहेत. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्ये मध्यवर्ती कार्यालयातील २२ पैकी ११ कोरोनाग्रस्तांवर उपचार घेत आहेत. आणि ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिक करून चालक आणि वाचकांची मृत्यूची संख्या आहे.

दरम्यान, संकटामुळे एसटी चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक, सुरक्षा रक्षक अशा कर्मचाऱ्यांचा आर्थिक मदत दिली गेली आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांना अद्याप दिलेली नाही. या कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा अंतर्गत नोकरी देण्याचे ठरवले आहे, परंतु याची प्रक्रिया अजून सुरु नाही. तसेच आजअखेर फक्त ८ कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.