Corona Alert : साबणानं पुन्हा-पुन्हा हात धुतल्यानं ‘ड्राय’ झाले हात तर ‘नो-टेन्शन’, ‘या’ पध्दतीनं बनवा ‘सॉफ्ट’, जाणून घ्या

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना विषाणूमुळे जगभरात कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लोक आपली घरे आणि आसपासची जागा स्वच्छ ठेवत आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांनुसार, लोक वारंवार साबण आणि पाण्याने आपले हात स्वच्छ करत आहेत जेणेकरून व्हायरस पसरू नये. परंतु, साबण, पाणी आणि सेनिटायझरने वारंवार हात साफ केल्यामुळे हातांना कोरडेपणा, हातावर खाज सुटणे ही समस्या उद्भवते. जर आपणास अशीच समस्या येत असेल तर आपण घरगुती उपचारांद्वारे ती दूर करू शकता.

तेलाने मालिश करा
कधीकधी हातांवर साबण आणि पाण्यामुळे ते कोरडे राहतात. अशा परिस्थितीत आपले हात साबणाने व पाण्याने धुल्यानंतर, 2 मिनिट तेलाने हाताने मालिश करा. हाताच्या मालिशसाठी आपण नारळ, मोहरीचे तेल वापरू शकता.

मलई
बर्‍याच लोकांना त्यांच्या त्वचेवर तेलाचा वापर करायचा नसतो अश्या वेळी आपण मलईचा वापर करू शकता. दुधापासून तयार होणारी मलई हातावर घासल्याने हात पुन्हा मऊ होऊ शकतात. मलई रगडल्याने हातांना ओलावा आणि पोषण प्रदान होते, यासह, हातांची त्वचा देखील चमकदार बनते.

ग्लिसरीन – गुलाब पाणी
हात मऊ करण्यासाठी आपण ग्लिसरीनचे काही थेंब 1 चमचे गुलाब पाण्यात मिसळून ते लावू शकता. ग्लिसरीन आणि गुलाबाचे पाणी नियमितपणे वापरल्याने हात पुन्हा मऊ होतील.

बॉडी लोशन किंवा क्रीम
जर आपण कोणतीही क्रीम किंवा बॉडी लोशन वापरत असाल तर आपण साबण आणि पाण्याने हात धुल्यानंतर ते हातावर अप्लाय करू शकता. जर आपण आपल्या हातांवर पुन्हा पुन्हा क्रीम किंवा बॉडी लोशन वापरु इच्छित नसाल तर तर रात्री झोपताना ते हातावर लावा. संपूर्ण रात्र हातावर क्रीम किंवा बॉडी लोशन लावून ठेवल्याने त्वचेचा ओलावा टिकून राहील.