Covid in India : बीपीच्या रूग्णांमध्ये जास्त धोकादायक आहे कोरोना, जाणून घ्या हायपरटेन्शन आणि कोविड-19 मधील कनेक्शन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना काळात तज्ज्ञांकडून सातत्याने उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. खाणे-पिणे आणि जीवनशैलीमध्ये बदल हायपटेन्शनचे सर्वात मोठे कारण आहे. तज्ज्ञांना अनेक संशोधनातून आढळले आहे की, उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना या भयंकर महामारीचा धोका जास्त आहे. महामारी जीव गमावणार्‍या रूग्णांध्ये सुद्धा हायपरटेन्शनचे रूग्ण जास्त आहेत. यासाठी उच्च रक्तदाब आणि डायबिटीजच्या रूग्णांनी जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना वायरस आणि हायपटेन्शनमध्ये काय संबंध आहे जाणून घेवूयात…

उच्च रक्तदाबाने ग्रस्त रूग्णांमध्ये कोरोनाचे गंभीर परिणाम
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार (आयसीएमआर) कोरोनाने संक्रमित 80 टक्के लोकांमध्ये हलकी लक्षणे दिसतात. परंतु उच्च रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित आजाराने पीडित लोकांमध्ये व्हायरस गंभीर रूप धारण करतो. त्यांना जास्त देखभालीची गरज असते.

तणाव हायपरटेन्शनचे मोठे कारण
टाइम्स नाऊ सोबत बोलातना सिनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ संतोष कुमार डोरा यांनी सांगितले की, उच्च रक्तदाब पासून वाचण्यासाठी तणावमुक्त रहा आणि नियमित ब्लड प्रेशर तपासत रहा. जर ब्लड प्रेशर वाढले तर नॉर्मल उपय करा.

प्री-हायपरटेन्शन उच्च रक्तदाबाला देते जन्म
ब्लड प्रेशर वाढल्याने उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. अशावेळी प्री-हायपरटेन्शन का होते, जाणून घ्यावे. कारण ही स्थिती हायपरटेन्शन संबंधी सर्व गोष्टींची सुरूवात असते. प्री-हायपरटेन्शन ती स्थिती आहे जेव्हा सिस्टोलिक रक्तदाब 120 ते 139 मिमी एचजीच्या दरम्यान असतो आणि डायस्टोलिक रक्तदाब 80 ते 89 मिमी एचजीच्या दरम्यान असतो. तर उच्च रक्तदाब त्या स्थितीला म्हणतात जेव्हा सिस्टोलिक रक्तदाब 140 मिमी एचीजी किंवा त्यापेक्षा जास्त असतो आणि डायस्टोलिक रक्तदाब 90 मिमी एचजी किंवा त्यापेक्षा जास्त असतो. उच्च रक्तदाबापासून वाचण्यासाठी प्री-हायपरटेन्शन नियंत्रित करा. याच्या 5 पद्धती जाणून घेवूयात…

हायपरटेन्शन नियंत्रित करण्याच्या पद्धती

संतुलित आहार आणि पाणी
हेल्दी डाएटद्वारे ब्लड प्रेशर मोठ्याप्रमाणात नियंत्रित केले जाऊ शकते. मीठ, तेलकट आणि मसालेदार जेवणाचे सेवन कमी करा आणि बॉडी हायड्रेट ठेवा. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या.

तणाव टाळा
हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कठिण काळात सुद्धा स्वतःला तणावापासून दूर ठेवावे. एक्सरसाईज, योगा, ध्यान आणि अरोमा थेरेपी करा.

नियमित औषधांचे सेवन करा
डॉक्टरांनी ब्लडप्रेशरचे दिलेले औषध स्किप करू नका. यामुळे ब्लड प्रेशर एकदम वर-खाली होऊ शकते.

दारूचे सेवन चुकूनही करू नका
या आजारात धूम्रपान आणि दारूपासून दूर रहा.

वजन कमी करा
हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर वजन नियंत्रणात ठेवा. वजन जास्त असेल तर शरीराच्या एकुण वजनाच्या केवळ 10 टक्के वजन कमी केले तरी ब्लड प्रेशर नियंत्रित राहील.