कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एका देशाची भारतीय विमान सेवेवर 10 दिवस बंदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –    भारतात कोरोनाची दुसरी लाट अधिकच भीषण होत चालली आहे. देशात बुधवारी तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहे. भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. ब्रिटनने भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. दुसरीकडे अमिरातने गुरुवारी घोषणा केली की, दुबई ते भारत दरम्यानची सर्व उड्डाणे दहा दिवस बंद राहणार आहे. 25 एप्रिल पासून पुढील दहा दिवस उड्डाणे चालणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.

दुबईने विमान सेवा बंद केल्यानंतर आता फ्रान्सने देखील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतातून येणाऱ्या पर्यटकांवर प्रवेश बंदी लागू करणार आहे. बुधवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. यापूर्वी अर्जेंटिना, चिली आणि ब्राझील येथून येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. शनिवारपासून भारतीय पर्यटकांच्या प्रवेशावर नवीन निर्बंध घालण्यात येणार आहेत.

सरकारचे प्रवक्ते ग्रॅब्रिएल अटाल यांनीही याची पुष्टी केली आहे की, फ्रान्स 3 मे पासून देशांतर्गत प्रवासावरील बंदी उठवेल, मात्र, रात्रीचे कर्फ्यू संध्याकाळी सात ते पहाटे सहा पर्यंत कायम राहतील. ते म्हणाले की, एप्रिलच्या सुरुवातीला लॉकडाऊनपासून बंदी असलेली अनावश्यक वस्तूंची दुकाने मे महिन्याच्या मध्यापर्यंत उघडता येणार नाहीत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी फ्रान्सने या महिन्याच्या सुरुवातीस ब्राझीलमधून येणारी
विमान सेवा थांबवली आहे.