43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह आढळला व्यक्ती, त्रस्त होऊन पत्नीला म्हणाला – ‘आता मरू दे’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – UK मध्ये कोरोना व्हायरस (Corona Virus) चे एक असे प्रकरण समोर आले आहे ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. इंग्लंड (England) च्या ब्रिस्टल (Bristol) मध्ये राहणारा 72 वर्षाचा एक ज्येष्ठ 43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळला. या ज्येष्ठ व्यक्तीचे नाव डेव्ह स्मिथ (Dave Smith) आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हा ज्येष्ठ लागोपाठ 10 महिन्यापर्यंत कोविड पॉझिटिव्ह होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

एखाद्या व्यक्तीमध्ये इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत कोरोना संसर्ग राहण्याचे हे पहिले प्रकरण आहे.
पेशाने रिटायर ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर डेव्ह स्मिथ कोरोना संक्रमित झाल्यानंतर सात वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
एका न्युज एजन्सीला दिलेल्या इंटरव्ह्यूत स्मिथने सांगितले की, कशा प्रकारे इतके दिवस लागोपाठ कायम राहिला.

स्मिथने म्हटले, माझी एनर्जी एकदम कमी झाली होती आणि एका रात्री मला लागोपाठ 5 तास खोकला आला. मी सर्व आशा सोडली होती.
मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले, सर्वांना शांततेत सांगितले आणि त्यांना गुडबाय म्हटले.

स्मिथ म्हणाले, 43 वेळा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी पत्नीला लिन ला म्हटले मला जाऊ दे. मला स्वतात अडकल्यासारखे वाटत आहे.
हे आता वाईटापेक्षा वाईट झाले आहे. तर लिनने म्हटले, अनेकदा आम्हाला असे वाटले की, आता स्मिथ हे आणखी जास्त काळ सहन करू शकणार नाही.
स्मिथ यांचा उपचार अँटी-वायरल औषधांनी करण्यात आला आणि त्यांच्या उपचारात दोन आठवड्यांचा वेळ लागला.
जेव्हा त्यांना डॉक्टरांकडून समजले की त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तेव्हा त्यांना आपल्या कानावर विश्वास बसला नाही.

यानंतर डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा थांबल्यानंतर पुन्हा टेस्ट करण्याचा सल्ला दिला.
त्यांनी चाचणी केली असता एक आठवड्यानंतर सुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
स्मिथ यांनी आपली कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्याचा आनंद शॅम्पेनची बॉटल उघडून साजरा केला.
स्मिथ यांनी म्हटले, आमच्याकडे खुप दिवसांपासून एक शॅम्पेनची बॉटल होती.
सामान्यपणे आम्ही ड्रिंक करत नाही परंतु त्या रात्री आम्ही ती बॉटल उघडून निगेटिव्ह रिपोर्टचा आनंद साजरा केला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : british man had covid 19 for 10 months in a row tested positive 43 times