Coronavirus : नेमकं कशामुळं दर सोमवारीच कमी संख्येनं आढळतात ‘कोरोना’चे नवे पॉझिटिव्ह? जाणून घ्या यामागचं Logic

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा सध्या विध्वंस सुरू आहे. भारत सध्या कोरोनामुळे सर्वात प्रभावित देश आहे आणि जगातील सर्वात जास्त केस येथेच आढळत आहेत. एप्रिलमध्ये दुसर्‍या लाटेने आपले विक्राळ रूप दाखवण्यास सुरूवात केली, मे मध्ये ती आणखी घातक झाली. मेच्या सुरुवातीच्या दिवसात अनेक दिवस कोरोनाच्या एकुण केस 4 लाखांपेक्षा जास्त झाल्या.

मात्र, आज म्हणजे सोमवारी (10 मे) केसमध्ये काही घट झाली आहे. परंतू मागील मोठ्या कालावधीतील आकड्यांवर नजर टाकली तर नेहमी सोमवारी कोरोनाच्या केस काही प्रमाणात कमी होतात. ज्यानंतर मंगळवार आणि शुक्रवार होता-होता अचानक कोरोना प्रकरणात वाढ होते. या पाठीमागे एक आश्चर्यकारक आणि खास कारण आहे, ते जाणून घेवूयात…

सोमवारी कमी का होतात कोरोना केस ?
देशात यावेळी सुमारे अडीच हजार लॅब आहेत, जिथे कोरोना टेस्ट केल्या जातात. कोरोना संकटाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत देशात लागोपाठ लॅब्जची संख्या वाढत आहे. सरासरी भारतात सध्या 17 ते 19 लाख टेस्ट दररोज केल्या जातात. परंतु, सोमवारी प्रकरणांमध्ये घट होण्यामागे कारण सुद्धा टेस्टच आहे.

कोराचे संकट भीषण झालेले असतानाही देशाच्या विविध भागात बहुतांश सरकारी आणि प्रायव्हेट लॅब रविवारी बंद असतात. रविवारी केवळ ठराविक लॅबच काम करतात, याच कारणामुळे रविवारी टेस्ट कमी होतात. जर रविवारी टेस्टची संख्या कमी झाली तर सहाजिकच सोमवारी प्रकरणांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होते. तुम्ही मागील सोमवारच्या आकड्यांवरून याचा अंदाज लावू शकता…

* 10 मे : 3,66,317 केस, 3,747 मृत्यू (सोमवार)
* 9 मे : 14.74 लाख टेस्ट (रविवार)

* 3 मे : 3,68,147 टेस्ट, 3417 मृत्यू (सोमवार)
* 2 मे : 15 लाख टेस्ट (रविवार)

* 26 एप्रिल : 3,52,991 केस, 2812 मृत्यू (सोमवार)
* 25 एप्रिल : 14 लाख टेस्ट (रविवार)

* 19 एप्रिल : 2,73,810 केस, 1619 मृत्यू (सोमवार)
* 18 एप्रिल : 13.56 लाख टेस्ट (रविवार)

* 12 एप्रिल : 1,68,912 केस, 904 मृत्यू (सोमवार)
* 11 एप्रिल : 14 लाख टेस्ट (रविवार)

सोमवारनंतर वाढतो वेग
देशात सध्या दर आठवड्याला सरासरी एक कोटी टेस्ट केल्या जातात. ज्यामध्ये आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट दोन्हींचा समावेश ओह. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी सर्वात जास्त टेस्ट केल्या जातात. तर विकेंडची सुटी असल्याने त्यांची संख्या रविवारी खुप कमी होते. भारतात सध्या सरासरी दररोज चार लाखांच्या जवळपास कोरोनाची प्रकरणे येत आहेत, तर एकुण अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या अजूनही 30 लाखोपक्षा जास्त आहे.