Corona | चिंताजनक ! ब्रिटन, रशियात कोरोनाचा नवा व्हेरिएंट तर चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Corona | कोरोनाच्या पहिल्या लाटेनं (Corona) जगाला एका मोठ्या संकटात टाकलं. त्यात अनेकांचा मृत्यु (Died) झाला. कोरोनाने एक भयावय वातावरण निर्माण केलं आहे. अनेक देशात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी चीन (China), रशिया (Russia) आणि ब्रिटन (Britain) या देशात कोरोनाच्या विषाणुने धुमाकूळ घातला आहे. या तीन देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. त्याचबरोबर चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता तेथे अनेक ठिकाणी कठोर निर्बध लावण्यात आले आहे. त्यामुळे नाहीसा झालेल्या विषाणुने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.

चीनमध्ये कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनांनी अशा भागात निर्बंध लावले आहेत. त्याचबरोबर हवाई वाहतुक सेवा स्थगित करण्यात आले आहे. तसेच, शाळा देखील बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुसरीकडे ब्रिटन आणि रशियामध्ये कोरोनाच्या (Coronavirus) नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. रशियामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) सबव्हेरिएंटची (Sub Variant of Delta) अनेक प्रकरणं समोर आली आहेत. असं म्हटलं जात आहे की, हा प्रकार पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक ठरू शकतो. कामिल खाफिजोफ नावाच्या संशोधकाने सांगितलं की AY.4.2 चा सबव्हेरिएंट सुमारे 10 टक्के अधिक प्राणघातक आहे, ज्यामुळे रशियामध्ये अनेक नवीन प्रकरणे आणि मृत्यू नोंदवले जात आहेत. मात्र, सध्या त्याच्या प्रसाराची गती मंद आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

7th Pay Commission | कॅबिनेटच्या निर्णयानंतर 20 हजारापासून 56 हजारपर्यंत बेसिक मिळणार्‍यांच्या पगारात होणार जबरदस्त वाढ, जाणून घ्या कॅलक्युलेशन

ब्रिटेनमध्ये (Britain) 27 सप्टेंबरपासून वाढलेल्या रुग्णसंख्येत 6 टक्के प्रकरणं याच व्हेरिएंटची आहेत.
यूके आरोग्य सुरक्षा एजन्सीच्या रिपोर्टमध्ये 15 ऑक्टोबरला हा खुलासा केला गेला आहे.
ब्रिटेनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी बुधवारी सांगितलं आहे की, सध्या असं समजण्याचं काही कारण नाही की हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकतो.
रशियाचे इम्यूनोलॉजिस्ट निकोले क्रुश्कोव म्हणाले, डेल्टा आणि त्याचे सबव्हेरिएंट भविष्यातही प्रभावीच राहतील.
हे व्हेरिएंट काही प्रकारच्या लसींनाही अप्रभावी करू शकतात.
तर, जेथे लसीकरण दर 50 टक्क्यांपेक्षा कमी किंवा जवळजवळ समान आहे.
दरम्यान, या देशात पुन्हा एकदा विषाणुने डोकं वर काढल्याने तेथे चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झालीय.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात दिराकडून 42 वर्षीय भावजयीला ‘अनैतिक’ संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; वारजे माळवाडीमध्ये विनयभंगाचा FIR

Hydrogen Fuel | ‘पेट्रोल-डिझेल’ला राहणार नाही ’किंमत’, 2030 पर्यत ’पाण्या’वर धावतील बस-ट्रक!

Pune Crime | पुण्यातील 31 वर्षीय विवाहीतेसोबत जबरदस्तीने शरीर ‘संबंध’, ‘लगट’ केलेल्याचे व्हिडीओ FB व्दारे पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Corona | coronavirus return in china lockdown announced at various places new variant of covid19 in russia and britain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update