Corona Cough Symptoms : खोकल्याकडे करू नका ‘दुर्लक्ष’, असू शकते कोरोनाचे लक्षण; ‘या’ 5 पद्धतीने करा तपासणी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोनाच्या बहुतांश रूग्णांना खोकल्याचा सामना करावा लागतो. हंगामी खोकला एक सामान्य समस्या आहे परंतु कोरोनाचा खोकला खुप गंभीर होऊ शकतो. समस्या ही आहे की, लोकांना अजून या गोष्टीची माहिती नाही की त्यांना सामान्य खोकला आहे की, कोरोनामुळे खोकला येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या सूक्या खोकल्यात सामान्यपणे एक खुपच विचित्र आवाज येतो, जो घशाच्या मागच्या बाजूने होतो. तो आवाज बदलवतो. यामध्ये आवाजात कर्कशता किंवा भूंकण्यासारखे वाटते. असे यामुळे होते कारण खोकल्यासह वायुमार्ग सतत बदलत असतो.

श्वासाच्या त्रासासह खोकला आणि ताप कोरोनाच्या संसर्गाचा ठोस संकेत आहे. सतत सूका खोकला श्वसन मार्गावर खुप दबाव टाकतो. जर असे झाले तर याचा अर्थ आहे की, हा हंगामी खोकला नाही आणि तुम्ही व्हायरसने संक्रमित असू शकता. कोरोनाच्या 40 टक्के रूग्णांनी सांगितले की, सुरूवातीच्या दिवसात त्यांना श्वास घेण्याचा त्रास जाणवला. श्वासाचा त्रास सुद्धा लाँग कोविडचा संकेत आहे. बहुतांश लोक संसर्गातून बरे झाल्यानंतर सुद्धा अनेक आठवडे त्रास अनुभवतात.

घशात खवखव होणे कोरोनाचे सामान्य लक्षण आहे आणि प्रत्येक व्यक्तीत वेगळे असू शकते. कोरोना प्रकरणात व्हायरस नाक आणि घशाला जोडलेल्या पडद्यात प्रवेश करतो, ज्यामुळे त्यास सूज येऊ शकते, ज्यामुळे खवखव होऊ शकते. ही खवखव आणि वेदनेला ’ग्रसनीशोथ’ म्हटले जाते. कोरोनाच्या प्रकरणात कुणाला घशात खवखवसह ताप, सूका खोकला आणि थकवा ही लक्षणे जाणवतात.

सामान्य सर्दी आणि फ्लूच्या दरम्यान नाक भरल्याने अनेक समस्या होऊ शकतात. यासोबतच वास आणि चव कमी होणे ही लक्षणे असू शकतात. पण यासोबत खोकला सुद्धा झाला तर कोरोनाशी संबंधीत असू शकतो. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वासाची क्षमता गमावण्याचा प्रकार सरासरी 41 टक्के आहे.