घरीच राहून करत आहात Covid चा उपचार? तरीसुद्धा मिळेल इन्श्युरन्सचा लाभ, जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोविड रूग्णांची संख्या लागोपाठ वाढत चालली आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजनची कमतरता आहे तर कुठे बेड नाहीत. अशावेळी अनेक लोकांना नाईलाजाने होम आयसोलेशनमध्ये म्हणजे आपल्या घरात राहून उपचार करावा लागत आहे. परंतु, अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आहे की, हॉस्पिटलमध्ये दाखल न होताही त्यांना हेल्थ इन्श्युरन्सचा लाभ मिळू शकतो. हे कसे शक्य आहे ते जाणून घेवूयात…

प्रत्यक्षात अनेक हॉस्पिटल कोविड रूग्णांना होमकेयर पॅकेज देत आहेत. अशा पॅकेजवर हेल्थ इन्श्युरन्सचा फायदा मिळू शकतो. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्सचे क्लेम, अंडररायटिंग आणि रिइन्श्युरन्स प्रमुख संजय दत्ता यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीकडे दरमहिना सुमारे 1,000 प्रकरणे होम ट्रीटमेंटची येत आहेत.

रिन्यूबायचे को-फाऊंडर इंद्रनील चॅटर्जी यांनी म्हटले की, निर्देशानुसार सर्व पॉलिसी अंतर्गत यास कव्हर केले जाते. असे असू शकते की काही जुन्या पॉलिसीजमध्ये यास कव्हर केलेले नसावे, परंतु सर्व नवीन पॉलिसीमध्ये यास कव्हर केलेले आहे. तुम्ही तुमच्या वीमा कंपनीच्या कॉल सेंटरमधून याची माहिती मिळवू शकता की, पॉलिसीमध्ये हे कव्हर समाविष्ठ आहे किंवा नाही.

सर्वम कव्हर
हॉस्प्टिलच्या अशा होमकेयर पॅकेजमध्ये मेडिकेशन, घरी नर्स किंवा डॉक्टरची व्हिजिट, सीटी स्कॅन, एक्सरे आणि कोविडची टेस्ट सारख्या सुविधांचा समावेश आहे. जोपर्यंत रूग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्याचे सर्व मेडिकल खर्च यामध्ये कव्हर केले जातात.

काय आहेत अटी :
अशा प्रकारच्या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही अटी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर्वप्रथम तर पेशंटचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट आयसीएमआरकडून मंजूर लॅबमधील असावा. रिपोर्ट आरटी-पीसीआर असावा. ज्यामध्ये स्पेशनमेन रेफरल फॉर्म (एसआरएफ) आयडी सुद्धा असवा. दुसरी अट ही आहे की, होम आयसोलेशन आणि उपचारादरम्यान रूग्ण डॉक्टरचा सल्ला घेत आहेत.

कोरोना कवच आणि कोरोन रक्षक पॉलिसी :
जर कुणाकडे कोरोनाच्या विशेष उपचाराशी संबंधीत कोरोना कवच किंचा कोरोना रक्षक पॉलिसी असेल तर त्यांनी अजिबात अस्वस्थ होण्याची अवश्यकता नाही. या दोन्ही पॉलिसीमध्ये होम केयर ट्रीटमेंटच्या कव्हरचा समावेश आहे.