Coronavirus : ‘कोरोना’बद्दल मुलांना समजवण्यासाठी नक्की सांगा ही ‘रंजक’ कहाणी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – “एक गाव होते दक्षिणपूर, त्याचे सरपंच खूप दयाळू होते. गाव आनंदी होते. पण दुष्टांना हे कुठे बघवते. एके दिवशी या श्रीमंत आणि आनंदी लोकांनी भरलेल्या गावावर असुर तोबाकाचीची नजर पडते. तोबाकाचीला त्याची भीती संपूर्ण देशात पसरून सिंहासनावर बसायचे होते. त्याने आपल्या एका सहकाऱ्याला जर्मासुरला सांगितले कि या गावात शोक कसा तयार करायचा. जर्मासुरने त्वरित एक उपाय सुचवला, तुम्हाला माहित आहे की आजकाल माझ्या कुटुंबावर कोरोना विषाणूने जग आणि देशात दहशत निर्माण केली आहे. परंतु लोक चतुरतेने आपले हात धुवून विषाणूला पूर्णपणे मात देत आहेत. तोबाकाची पुन्हा म्हणाला, तर जर्मासुर म्हणाला, आपण या गावातून साबण गायब केले तर? ”

‘लापता साबुन’ या शीर्षकाखाली लिहिलेली ही कथा इतकी रंजक आहे कि अभ्यास करताना मुलंच काय मोठेही हरवतील. katha.org च्या संस्थापक आणि या कथेच्या लेखिका गीता धर्मराजन यांनी कोरोना विषाणूची भारत आणि जगातील दहशत आणि वारंवार हात धुण्याची सूचना आणि मेडिकल स्टोअरमधून गायब होणारे सॅनिटायझर याबद्दलची एक रंजक कथा सांगितली आहे.

राक्षसाच्या त्याच्या आक्रमकी हल्ल्याची कथा हे देखील सांगते की, मेडिकल स्टोअरमधून गायब झालेल्या सॅनिटायझरमुळे घाबरण्याची गरज नाही. आपण घरी सॅनिटायझर आणि साबण बनवू शकतो. २०-३० मिनिटांत साबण-सॅनिटायझर बनवण्याच्या पद्धती देखील उत्तेजक मार्गाने वर्णन केल्या आहेत. जितक्या रोमांचक पद्धतीने राक्षस म्हणजे विषाणूच्या हल्ल्याची कथा सांगण्यात आली आहे.

ही कथा जितकी मजेदार आहे तितकी जिवंत आणि गुदगुल्या करणारे इलस्ट्रेशन देखील आहे. शुद्ध सत्व बसु आणि चार्वाक दीप्ता यांनी या कथेसाठी इलस्ट्रेशन बनवले आहेत.

‘लापता साबुन’च्या लेखिका गीता धर्मराजन सांगतात, “मुलांना महामारीबद्दल आजकाल विस्तृत सूचना देण्यात येत आहेत. काय करावे आणि काय करू नये? टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्रे, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर अशामध्ये हा एक प्रयत्न आहे की, मुलांना या गंभीर महामारीबद्दल केवळ सांगावेच नाही तर त्यांना न घाबरता सांगावे की स्वतःची आणि त्यांच्या प्रियजनांची काळजी कशी घ्यावी.”

katha.org चे डायरेक्टर आनंद राणा म्हणतात की, “आमची संस्था मुलांना मनोरंजक पद्धतीने गंभीर प्रश्नांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. या प्रयत्नाचा परिणाम म्हणजे ‘लापता साबुन’ या शीर्षकाखाली लिहिलेले हे ई-बुक विनामूल्य उपलब्ध आहे. विशेष गोष्ट अशी आहे की हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ आणि आसामी भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे.