Coronavirus : जगभरासाठी ‘आदर्श’ बनलेत ‘हे’ 18 देश, ‘कोरोना’वर मात करण्यात मिळालंय यश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्षाच्या सुरूवातीपासूनच कोरोनाने जगभरातील जवळजवळ ४२ लाख लोक आजारी आहेत. जवळपास 3 लाख लोकांचा जीव घेतला आहे. १९० हून अधिक देश या विषाणूचा सामना करत आहेत. जगातील एक तृतीयांश लोकसंख्या घरात बंद आहे. पण या जगात असेही काही देश आहेत, जेथे कोरोना पोहोचलेलाच नाही. हे ते देश आहेत, ज्यांनी वेळेतच आपापल्या देशाच्या सीमा सील केल्या होत्या.

कोरोनापासून बचावले आहेत हे देश आणि द्वीप
किरीबाती, अमेरिकन समोआ, लेसोथो, मार्शल आयलँड, मीक्रोनेशिया, नाउरू, पलऊ, समोआ, सोलोमन आयलँड, टोंगा, टूवालू, वानुआतु, टोकेलाऊ, निउ, द कुक आयलँड, सालमन, तुर्कमेनिस्तान आणि उत्तर कोरिया. एकंदरीत पृथ्वीवर दीड डझन बेटे आणि देश आहेत, जे कोरोना व्हायरसच्या या महामारीत घरात कैद होण्याऐवजी बीचवर पार्टी करत आहेत. संपूर्ण जगाला या विषाणूचा धोका असताना या ठिकाणी विषाणू न पोहोचणे हैराण करते. परंतु तसे पाहिले तर जगाच्या नकाशामध्ये तुर्कमेनिस्तान सोडून हे ते बेट आणि देश आहे, जेथे पर्यटक पोहोचणे इतके सोपे नाही किंवा त्यांना तिथे जाण्याची परवानगी नाही.

या ठिकाणी का नाही पोहोचला प्राणघातक व्हायरस
हा एक प्रश्न आहे. यापैकी पहिले बेट आणि देश आहेत, जे जास्तकरून आफ्रिकन खंडाचा भाग आहेत. जेथे पोहोचणे एकतर अवघड आहे किंवा तेथे विदेशी आणि पर्यटकांचे येणे-जाणे कमी आहे. दुसरे ते देश आहेत जे सत्य लपवण्याच्या संशयाखाली आहेत. उदाहरणार्थ चीन, रशिया, दक्षिण कोरियाशी लागूनही उत्तर कोरियामध्ये एकही प्रकरण नोंदवलेले नाही. तर कोरोना विषाणूमुळे आजूबाजूच्या देशांमध्ये विनाश झाला आहे. तुर्कमेनिस्तानवरही असेच काही आरोप आहेत.

कोरोनापासून असे बचावले आफ्रिकन खंडातील देश
अखेर या देशांनी किंवा बेटांनी असे काय केले? जे बाकीचे जग करू शकले नाही. झाले असे की, कोरोना विषाणूची बातमी कळताच आफ्रिकन खंडातील या देशांनी या महामारीचा धोका ओळखला होता. आणि या छोट्या बेटांच्या सरकारने परदेशातून येणार्‍या प्रवाशांना रोखण्यासाठी त्वरित प्रवासावर बंदी आणण्यास सुरवात केली. काही प्रकरणांमध्ये अगदी क्रूझ जहाज आणि कार्गो जहाजांनाही परवानगी नाकारली गेली. मात्र इतर आफ्रिकन देशांनीही अशी पावले उचलली. परंतु तेथे एक-दोन तरी कोरोनाची प्रकरणे आहेतच. परंतु या देशांमध्ये कोरोनाची एन्ट्रीही झाली नाही.

बॉर्डर सील करण्याचा फायदा
ही बेटे आणि देश जगाच्या नकाशाचा भाग आहेत, परंतु ती आकाराने छोटी आहेत आणि त्यांची लोकसंख्या देखील खूपच कमी आहे. परंतु त्यांना कोरोनाची कोणतीही भीती नाही. ते पूर्वी जगत होते, तशाच प्रकारे जगत आहेत. त्यांच्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नाही आणि हे सर्व सीमा सील केल्यामुळे झाले आहे. कारण कोरोनाचा संसर्ग तोपर्यंत पसरत नाही, जोपर्यंत लोक कोरोना संक्रमितांच्या संपर्कात येत नाहीत. पण जर कोरोनाचा एक जरी संक्रमित आढळला असता तर या बेटांचा आणि देशांचा प्रकोप झाला असता. कारण या देशांमध्ये वैद्यकीय सुविधांच्या नावावर फारसे काही नाही. पण चांगली गोष्ट म्हणजे किमान या पृथ्वीवर अशी काही माणसे आहेत जी कोरोनापासून सुरक्षित आहेत.

भारतात कोरोनापासून बचावली आहेत ही राज्ये
जगातील सर्व देशांप्रमाणेच भारतातही अशी काही राज्ये आहेत जी कोरोना विषाणूपासून अबाधित आहेत. यात सर्वात पहिले नाव येते सिक्कीम आणि नागालँडचे. ज्यांच्या आसपासच्या आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांमध्ये कोरोनाची प्रकरणे आहेत. पण सिक्कीम आणि नागालँड यापासून दूर आहेत. तसेच केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीप देखील कोविड-१९ पासून बचावला आहे.