Coronavirus : ‘कोरोना’नं मोडले आतापर्यंतचे सर्व ‘विक्रम’ ! गेल्या 24 तासात 75760 नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 33 लाखांच्या पुढं

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहे. 75,760 नवीन पॉझिटिव्ह प्रकरणासह भारतातील एकूण प्रकरणांची संख्या 33 लाखाच्या पुढे गेली आहे. एका दिवसात ही सर्वात जास्त सकारात्मक प्रकरणांची संख्या आहेत. इतकेच नव्हे तर आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 1023 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

केंद्र सरकारद्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचे एकूण प्रकरणे 33,10,235 झाली आहेत. यामध्ये 7,25,991 अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत 25,23,772 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

ओडिसामध्ये 200 कोटीच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा
कोरोना व्हायरच्या महामारीमुळे आर्थिक तंगीशी झगडत असलेल्या ओडिसाच्या गरीब परिवार आणि गरजूंसाठी नवीन पटनायक सरकारने मोठी घोषणा केली आहे. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बुधवारी राज्यामध्ये कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या गरीब आणि गरजू परिवारांसाठी 200 कोटी रुपयाचे विशेष सहाय्य पॅकेजला मंजूरी दिली आहे. त्यांनी कोविड-19 मुळे झालेली परिस्थिती आणि त्याच्या प्रबंधनाच्या समीक्षा बैठकीमध्ये याला मंजूरी दिली आहे. या बैठकीमध्ये कलेक्टरपासून ते सीनिअर सरकारी अधिकारी उपस्थित होते.

अधिकृत विधानामध्ये सांगितले आहे की, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनरुद्धारावर जोर देताना मुख्यमंत्री पटनाईक यांनी कोविड -19 साथीच्या आजारामुळे पीडित राज्यातल्या गरीब आणि अत्यंत गरीब कुटुंबांसाठी 200 कोटींच्या विशेष सहाय्य पॅकेजला मान्यता दिली. हे विशेष सहकार्य पॅकेज ग्रामीण भागातील गरीब, अत्यंत गरीब आणि स्थलांतरितांना उपजीविकेच्या विकासासाठी मदत करेल.

कोरोना विषाणूमुळे शरीरातील सर्व भाग प्रभावित
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) च्या तज्ज्ञांनी बुधवारी सांगितले की, कोविड-19 चा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नाही तर सर्व अवयवांवरही होऊ शकतो आणि प्राथमिक लक्षणे छातीच्या तक्रारींशी पूर्णपणे असंबंधित असू शकतात. इतर अंगांचा समावेश करण्यासाठी, श्वास घेण्याच्या लक्षणांच्या आधारे सौम्य, मध्यम आणि गंभीर प्रकारात प्रकरणांचे वर्गीकरणावर पुन्हा विचार करण्याची गरज आहे, यावर त्यांनी भर दिला.

एआयएमएसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, न्यूरोलॉजिकल विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही. पद्म श्रीवास्तव, हृदय रोगशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. अंबुज राय, मेडिसिन विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. नीरज निश्चलयांच्यासह संस्थेच्या वैज्ञानिकांनी नीति आयोगासोबत मिळून आपल्या साप्ताहिक ‘नॅशनल क्लिनिकल ग्राउंड राउंड्स’ मध्ये कोविड -19 मध्ये फुफ्फुसांवर संभाव्य गुंतागुंतीवर चर्चा केली.