‘कोरोना’ युद्धात ‘किंग’ खानची मोठी मदत ! दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी मानले आभार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी सिनेमामुळं चर्चेत आला आहे. कोरोना काळात शाहरुखनंही दिलखुलासपणे मदत केली आहे. आता पुन्हा एकदा मदत दिल्यानं तो चर्चेत आला आहे. आता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी ट्विट करत शाहरुखचे आभार मानले आहेत.

जैन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आम्ही शाहरुख आणि मीर फाऊंडेशनचे मनापासून आभार मानतो. त्यांनी दिल्लीला 500 रेमडिसीव्हर इंजेक्शन (Remdesivir Injection) डोनेट केले आहेत तेही त्या काळात जेव्हा जास्त गरज होती. कठिण काळात आपल्या मदतीसाठी आम्ही आभारी आहोत.

जेव्हापासून जैन यांचं हे ट्विट समोर आलं आहे तेव्हापासून प्रत्येकजण शाहरुखचं कौतुक करताना दिसत आहे. अनेकजण त्याला मसीहा म्हणत आहेत तर अनेकांनी त्याचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं आहे. शाहरुखनं याआधीही कोरोना काळात लोकांची खूप मदत केली आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे.