Corona Delta Variant | चिंताजनक ! डेल्टा व्हेरिएंटची सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात; ‘या’ 8 राज्यांतच 50 % प्रकरणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) – देशात थैमान घातलेली कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) ओसरत असतानाच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटने (Delta plus variant) धुमाकूळ घातला आहे. डेल्टा व्हेरिएंटचे देशातले 50 टक्के रुग्ण 8 राज्यांत सापडले आहेत. त्यात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. हा व्हेरिएंट घातक समजला जात आहे. कारण लशीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीज (Antibodies) आणि नैसर्गिक संसर्गामुळे तयार झालेली प्रतिकारशक्ती (Immunity) या दोन्ही गोष्टी निष्प्रभ ठरवण्याची क्षमता या डेल्टा प्लस व्हॅरिएंटमध्ये (Corona Delta Variant) असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वाधिक 21 रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडूत 9, मध्य प्रदेशात 7, पंजाबात 2, गुजरातेत 2, केरळमध्ये 3 तर आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक या राज्यांत डेल्टा प्लसचा प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात नवे निर्बंध लागू केले आहेत. केवळ आरटीपीसीआर (RTPCR) चाचण्यांच्या आधारे निर्बंध हळूहळू शिथिल किंवा कडक केले जाणार आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यास निर्बंध कडक केले जाऊ शकतात, असे संकेत दिले आहेत.

डिसेंबर 2020 मध्ये डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण केवळ महाराष्ट्रात, एका जिल्ह्यात आढळला होता.
मार्च 2021 पर्यंत तो देशातल्या 54 जिल्ह्यांत पोहोचला, तर आता तो 174 जिल्ह्यांत पोहोचला आहे.
देशात आतापर्यंत 21,109 सॅम्पल्समध्ये गंभीर व्हेरिएंट असल्याचे दिसले आहे.
त्यात अल्फा व्हेरिएंट 3969 नमुन्यांत बीटा व्हेरिएंट 149 नमुन्यांत, गॅमा व्हेरिएंट एका नमुन्यात.
तर डेल्टा आणि कप्पा व्हेरिएंट 16238 नमुन्यांत सापडल्याचे राष्ट्रीय महासाथ नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ. सुजितकुमार सिंह यांनी सांगितले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :- corona delta variant 50 percent cases in eight states the highest number of patients of Delta variant is in Maharashtra

हे देखील वाचा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)