नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात डेल्टा व्हेरिएंटने लोक वेगाने संक्रमित (Corona Delta Variant) होत आहेत. तसेच चिंतेचा विषय हा आहे की यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रूग्णांमध्ये हा संसर्ग (Corona Delta Variant) वेगाने वाढत आहे. नुकत्याच नोंदलेल्या एका रिपोर्टनुसार कोविड-19 लस घेतल्यानंतर सुद्धा डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. यामुळे लोकांचा समज होत चालला आहे की, लसीकरणानंतर सुद्धा ते सुरक्षित नाहीत.
मात्र, कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेत संक्रमित लोकांचा मृत्यूदर कमी झाला आहे. परंतु संसर्गाची प्रकरणे अजूनही वाढत आहेत. व्हायरस सातत्याने परिवर्तनाच्या (म्यूटेशन) माध्यमातून विकसित होत आहे आणि व्हायरसचे नवीन प्रकार उत्पन्न होत आहेत. कधी-कधी ते मुळपेक्षा जास्त धोकादायक असतात. डेल्टा व्हेरिएंटसुद्धा व्हायरसच्या परिवर्तनाचा परिणाम आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात…
10 प्रमुख COVID-19 तज्ज्ञांनुसार, कोरोना व्हायरसच्या कोणत्याही म्यूटेशनमुळे होणारा गंभीर संसर्ग आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या विरूद्ध व्हॅक्सीन सुरक्षा खुप मजबूत आहे. परंतु तज्ज्ञांनी म्हटले की, असेही पुरावे वाढत आहे की, मागील म्यूटेशन्सच्या तुलनेत जास्त प्रमाणात, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संक्रमित करण्यात सध्याचा म्यूटेशन सक्षम आहे. चिंता व्यक्त करण्यात आली आहे की, ते व्हायरस सुद्धा पसरवू शकता.
डेल्टा व्हेरिएंटबाबत मायक्रोबायोलॉजिस्ट शेरोन पीकॉक, जे कोरोना व्हायरस व्हेरिएंटच्या जीनोमला अनुक्रमित करण्यासाठी ब्रिटनमध्ये काम करतात, त्यांनी म्हटले की, सध्या जगासाठी सर्वात मोठी जोखिम केवळ डेल्टा आहे. शेरोन पीकॉक यांनी डेल्टा व्हेरिएंटला आतापर्यंतचे सर्वात वेगवान म्यूटेशन म्हटले आहे.
सध्या जोपर्यंत डेल्टा व्हेरिएंट ट्रान्समिशनवर जास्त डेटा जमवला जात नाही तोपर्यंत रोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, व्यापक लसीकरण अभियान चालवणार्या देशांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाय पाळण्याची पुन्हा आवश्यकता भासू शकते. सोबतच कोविडच्या सर्व नियमांचे कठोर पालन करण्याची सुद्धा आवश्यकता आहे.
डेल्टा व्हेरिएंटची इतर देशांमधील स्थिती
इंग्लंड
एकुण दाखल रूग्ण 3,692, यापैकी 58.3% लोकांचे लसीकरण झालेले नव्हते. 22.8% रूग्णांनी पूर्ण डोस घेतले होते.
सिंगापुर
येथे डेल्टाच्या एकुण प्रकरणात तीन चथुर्तांश लसीकरण झालेल्या व्यक्ती आहेत. मात्र कुणी गंभीर नाही.
इस्त्रायल
सध्या दाखल कोविड 19 ची 60% प्रकरणे लसीकरण झालेल्या लोकांची आहेत.
यात बहुतांश 60 वर्षावरील आहेत.
अमेरिका
येथे डेल्टा म्यूटेशनचा कहर सुरू आहे. डेल्टा म्यूटेशनची जवळपास 83% नवी संसर्गाची प्रकरणे समोर आली.
आतापर्यंत लस न घेतलेल्या लोकांमध्ये जवळपास 97% गंभीर प्रकरणे नोंदली गेली आहेत.
Web Titel :- Corona Delta Variant | other are people becoming victims of delta variants even after vaccination know what experts have to say
Dieting | वजन वाढल्यास ‘इथं’ सरकार करून घेते डाएटिंग, न केल्यास भरावा लागतो दंड