आगामी 4 महिन्यात ‘कोरोना’वर अनेक औषधं उपलब्ध होणार, CSIR च्या महासंचालकांची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोना लशीवर संशोधन सुरु आहे. जगात चार लसी या सर्वात पुढे आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निकाल आल्यानंतर त्या सर्व सामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. भारतात लस उत्पादन आणि वितरणाचे सृदृढ जाळे आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ही लस पोहचण्यास अडचण येणार नसल्याची माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे.

भारतातील लशीची थेट तिसरी चाचणी
भारतात देखील कोरोना लस तयार होत आहे. या लसीच्या पहिल्या चाचणीचे निकाल आल्यानंतर थेट तिसरी चाचणी करण्यात येणार आहे. तसेच लसीच्या तुलनेत औषधावरील संशोधन अतिशय प्रगत आहे. फेरमविर सारखे जेनेरिक औषध देशात उपलब्ध आहे. आगामी चार महिन्यात आणखी काही औषधे उपलब्ध होणार असल्याचे मतही डॉ. मांडे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचं पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याने आता पल्लवित झाल्या आहेत. ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युचीही या लशीची निर्मितीत भागीदारी आहे. त्यामुळे भारतात देखील ही लस उपलब्ध होणार आहे. मात्र, या लसीच्या किंमती किती असती, सर्वसामान्यांना परवडणारी असेल का ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे.