वस्तुस्थिती : आदित्य ठाकरेंनी आदेश देताच ‘फिल्म सिटी बंद’ ? जाणून घ्या सत्य

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. त्यामध्ये खबरदारी, जनजागृतीला पाधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाने तीन जणांचा बळी घेतला आहे. याचा परिणाम मुंबईतील मायानगरीवर अर्थात फिल्म सिटीवर झाला आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने फिल्म सिटी बंद करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फिल्म इंडस्ट्रीचे टीव्ही आणि वेब चेअरमन जेडी मजिथिया यांच्याशी दुरध्वनीवर संवाद साधला. फिल्म इंडस्ट्रीतील एकूणात परिस्थितीचा आढावा घेतला. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांनी फिल्म, टीव्ही आणि वेब इंडस्ट्रीतील शूटिंग तत्काळ बंद करण्याचे निर्देश चेअरमन जे.डी. मजिथिया यांनी दिले आहेत. तसेच शूटिंग बंद करण्यासाठी बीएमसीला नोटिस देण्याच्या सुचना देखील दिल्या असल्याची माहिती सोशल मीडियातून फिरत होती.

या माहितीमुळे फिल्म सिटीत खळबळ उडाली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने कर्मचारी आणि फिल्म स्टूडिओ अँड एलाइड मजदूर यूनियन संस्था आक्रमक झाल्या होत्या. फिल्म सिटीचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर सुभाष शांताराम बोरकर यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता बीएमसीच्या आयुक्तांच्या निर्देशानुसार तत्काळ शूटिंग सेट बंद करण्यात आले आहे. कपिल शर्माचा रियलिटी शो आणि संजय लीला भंसाली यांचा फिल्म सेटसह सर्व सेटवरील शूटिंग रोखण्यात आले आहे.