Coronavirus Impact : लाकडाऊनचा फायदा ! ‘या’ अभिनेत्रीचा बॉयफ्रेंडसोबत घरात सुरूय ‘रोमँस एके रोमँस’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या भीतीनं सर्वच लोक मग सामान्य असो वा कलाकार असो घरात बंद आहेत. सध्या अनेक शहरात लॉकडाऊन सुरू आहे. सारेच सेलेब्स घरात असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ते चाहत्यांचा संपर्कात आहेत. आपले निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मराठी अभिनेत्री जी शनायाच्या भूमिकेसाठी फेमस आहे अशी ईशा केसकर सध्या सोशलवर चर्चेत आली आहे. तिचे आणि तिच्या आयुष्यातील खास व्यक्ती ऋषी सक्सेना यांचे काही फोटो समोर आले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

ईशानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ईशा बॉयफ्रेंड ऋषीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सध्या त्यांचे अनेक रोमँटीक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यांच्यातील रोमँटीक केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडली आहे.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती माझ्या नवऱ्याची बायको या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती शनाया ची भूमिका साकारत आहे जी प्रेक्षकांमध्ये खूपच फेमस आहे. 2013 साली आलेल्या वि आर ऑन होऊन जाऊ द्या या सिनेमातून तिनं आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमातही तिनं काम केलं आहे. झी मराठीच्या जय मल्हार या मालिकेमुळं ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिची बानू ची भूमिका सर्वांनाच आवडते.