Coronavirus : मॉलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त थुंकला, मृत्यूदंडाची शिक्षा ?

रियाध :  वृत्तसंस्था – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी अनेक प्रगत देशही प्रयत्न करत आहेत. परंतु सौदी अरेबियात एका शॉपिंग सेंटरमध्ये ट्रॉली आणि दरवाजावर एकजण थुंकल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला मृत्यूदंडाची शिक्षादेखील होऊ शकते.

डेली मेलने याबाबतचे दिले आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती परदेशी नागरिक असून ती शॉपिंग मॉलमध्ये असताना तो ट्रॉली आणि दरवाज्यावर थुंकला. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची वैद्यकिय तपासणी केली. त्यावेळी त्याला कोरोनाची बाधा झालेली असल्याचे समोर आले. त्याने ही कृती का केली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी त्याची ओळख गुप्त ठेवली आहे.

You might also like