‘कोरोना’वर उपचार सापडला ! रुग्णांना दिले जाईल ‘हे’ अँटीव्हायरस औषध, अमेरिकेतून केलं जातंय आयात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोरोना विषाणूच्या उपचारासाठी एक इंजेक्शन वापरण्यास मान्यता दिली आहे. या इंजेक्शनचे नाव रीमॅडेसिव्हिर (Remdesivir) आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याच्या क्लिनिकल चाचण्यांवर देखरेख ठेवली जात होती. कोरोना उपचारात अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर भारतातील रूग्णांवर या इंजेक्शनच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे डॉ. व्ही.जी. सोमानी म्हणाले की, कोरोनाने संक्रमित असलेले वयस्कर आणि मुलांमध्ये या इंजेक्शनच्या वापरास मान्यता देण्यात आली आहे. हे इंजेक्शन गिलियड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने तयार केले आहे. ते अमेरिकेतून आयात केले जात आहे.

या दरम्यान अशीही बातमी समोर येत आहे की सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन या औषधाला 10 दिवसांऐवजी केवळ 5 दिवसांच्या वापरास मान्यता देऊ शकते. तथापि या औषधाच्या वापरामुळे 10 दिवसात परिणाम बदलतील याचा पुरावा नाही.

या अहवालानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले आहे की कंपनीने आतापर्यंत जी आकडेवारी सादर केली आहे त्यामध्ये या औषधाचा 10 दिवसांपर्यंत उपयोग केल्याने काही विशिष्ट परिणाम दिसून आला नाही. अशा परिस्थितीत पाच दिवसांपेक्षा जास्त काळ या औषधाचा उपयोग करण्याला काही अर्थ नाही. तसेच ते म्हणाले की हे औषध आता जेनेरिक परवान्याखाली भारतात तयार केले जाईल. ते म्हणाले की, हे औषध केवळ पाच दिवस वापरल्यास रुग्णांच्या पैशांत बचत होईल.