गेल्या एका महिन्यापासून घरातून बाहेर नाही निघाले ‘बिग बी’, तरीही बच्चन कुटुंबाच्या घरात कसा घुसला कोरोना ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटीव आल्यानंतर अभिषेक बच्चननंही कोरोना टेस्ट केली आणि त्यालाही कोरोना झाल्याचं समोर आलं. यानंतर बच्चन कुटुबाच्या इतर सदस्यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. यात ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन पॉझिटीव्ह निघाल्या. बच्चन कुटुबात फक्त जया बच्चनच कोरोना निगेटीव्ह आल्या. सध्या बिग बींना नानावती हॉस्पिटलच्या आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या पीआरओनं सांगितलं की, अमिताभ यांच्या कोरोनाची हलकी लक्षणं आहेत.

बिग बी यांच्या कुटुंबाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या बाहेर जाण्यानंच कोरोना घरापर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक त्याची वेब सीरीज ब्रीद च्या डबिंगसाठी साऊंड अँड डबिंग स्टुडिओत जात होता. परंतु अमिताभ बच्चन मात्र लॉकडाऊन लागू झाल्यानंतर घरातून बाहेर निघालेले नाहीत.

समोर आलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा कॉविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर साऊंड अँड डबिंग स्टुडिओ ताप्पुरता बंद करण्यात आला आहे. ट्रेल अॅनलिस्ट कोमल नाहटानं देखील ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो ओटीटीवर रिलीज झाला आहे. याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर आधीच रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like