‘कोरोना’चा द्राक्ष निर्यातीला जबर फटका, 25 % घट

लासलगाव – गेल्या काही वर्षांपासून अवकाळी गारपीट,अतिवृष्टी अशा संकटांमध्येही दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेणारा नाशिक जिल्ह्यातील शेतकरी त्यांच्या निर्यातीसाठी सज्ज असतानाच चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्याने याचा मोठा आर्थिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांला बसला आहे.जगात कोरोनाने हाहाकार उडाला असताना त्याचा मोठा परिणाम द्राक्ष निर्यातीवर झाला आहे. त्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना बसला असून, द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपण्यात आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने मजुर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो मेट्रीक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २४ टक्के घट झाल्याचे एपीडाच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे निर्यातक्षम असून ती मोठ्या प्रमाणात विदेशात पाठविली जातात.२० मे पर्यंत ९२ हजार ३४२ क्विंटल द्राक्ष निर्यात झाली असून मागील वर्षी २० मे पर्यंत १ लाख २१ हजार ४७० क्विंटल द्राक्ष निर्याय झालेली होती मात्र कोरोनामुळे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 29 हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात कमी झालेली आहे

आधी राज्यात आणि नंतर देशभरात लॉक डाऊन करण्यात आले असून संचारबंदी लागु करण्यात आल्याने द्राक्षासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. द्राक्ष बागायतदारांकडे असलेले मजुर भीतीपोटी निघून गेले आहेत. द्राक्ष काढण्याबरोबरच पॅकेजींगसाठी देखील कामगार लागतात. मात्र संचारबंदीमुळे पाच पेक्षा अधिक कामगार जमण्यास परवानगी नसल्याने त्याची देखील अडचण निर्माण झाली आहे दरम्यान या सर्वांचा फटका हा द्राक्ष निर्यातीला बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक कोंडीत सापडलेला आहे

देशाची द्राक्ष निर्यात

२०१५-१६ – १३२६४७ मैट्रिक टन – १३६२.२६ कोटि
२०१६-१७- १९८४७१ मैट्रिक टन – १७८१.७१ कोटि
२०१७-१८- १८८२२१ मैट्रिक टन – १९०० कोटि
२०१८-१९ – २४६१३३ मैट्रिक टन- २३३५ कोटि

२० मे २०२० पर्यंत प्रमुख देशातील द्राक्ष निर्यात

नेदरलेंड – ४३२० कंटेनर -५८३६६ मैट्रिक टन
यूनाइटेड किंडम – ११०६ कंटेनर -१५२०९ मैट्रिक टन
जर्मनी – ७५८ कंटेनर -१०१४० मैट्रिक टन
डेनमार्क – १४० कंटेनर -१७५९ मैट्रिक टन
फिनलैंड – ८१ कंटेनर -१००१ मैट्रिक

परकीय चलनात घट

द्राक्ष हे देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे.सन २०१८-१९ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २३३५ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. या हंगामात द्राक्ष बागा परतीच्या आणि अवकाळी पाऊस,आणि कोरोना या संकटात सापडल्यामुळे द्राक्ष निर्यातीत २५ टक्के घट झाल्याने याचा फटका देशाच्या परकीय चलनावर बसलेला आहे