Coronavirus : ‘मास्क’ आणि ग्लोव्हज कचर्‍यात कसे फेकाल, जाणून घ्या नियमावली

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत चालला आहे. कोरोनापासून वाचायचे असते तर मास्क वापरणे खुप जरूरी आहे. मास्कबाबत केंद्र सरकारने सुद्धा लोकांना अनेकदा आवाहन केले आहे, ज्याचा परिणाम सुद्धा दिसून येत आहे. लोक मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करत आहेत. परंतु, मास्कचा वापर संपल्यानंतर तो कसा फेकायचा, याबाबत लोकांना माहिती नाही, ज्यामुळे त्याचे चुकीचे परिणाम दिसून येत आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या गाईडलाइननुसार सामान्य व्यक्ती ज्याच्यामध्ये कोरोनाचा अजिबात संसर्ग नाही, त्याने मास्क किंवा ग्लोव्हज फेकताना, ते 72 तास म्हणजे तीन दिवस पेपर बॅगमध्ये ठेवले पाहिजे. नंतर ते कापून कचरा गाडीच्या सुख्या कचर्‍यात टाकावे. हे मास्क आणि ग्लोव्हज कोविड वेस्ट किंवा बायो मेडिकल वेस्ट मानले जाणार नाही.

जर तुम्ही कोरोना व्हायरसने संक्रमित असाल तर वापरलेला मास्क आणि ग्लोव्हजला कोविड वेस्ट म्हटले जाईल. असे मास्क आणि ग्लोव्हज फेकण्यासाठी वेगळ्या झाकणाच्या बॉक्सचा वापर केला पाहिजे. अशाप्रकारच्या रूग्णाचे मास्क आणि ग्लोव्हज घेण्यासाठी कोविड वेस्ट किंवा बायो मेडिकल वेस्ट गाडी येईल किंवा महापालिकेच्या काळ्या बॉक्समध्ये ते टाकावे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने आपल्या गाईड लाईनमध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की, कोरोना महामारीत वापरण्यात येणार्‍या प्रत्येक वस्तूला कोविड वेस्ट म्हणता येणार नाही. मास्क, ग्लोव्हज, फेकलेली औषधे, सिरींज, युरिन बॅग, ड्रॅन बॅग, बॉडी फ्लूयड, ब्लड सोक्ड टिश्यूज, किंवा कॉटनला कोविड वेस्ट मानले जाईल. तर मेडिसिनचे बॉक्स, रॅपर, फळांच्या साली, ज्यूस बॉटल इत्यादीला कोविड वेस्टमध्ये ठेवता येणार नाही.