कोरोना काळात संसर्गापासून वाचवू शकतात ‘या’ 5 गोष्टी, इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोगी; जाणून घ्या

नवी दिल्ली : एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, व्हिटॅमिन सी सारखी पोषक तत्व प्रतिकारशक्तीला मजबूत बनवण्यासाठी मदत करतात. आम्ही आपल्याला व्हिटॅमिन सी भरपूर असलेल्या काही खाद्य पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे महामारीसह इतर अनेक आजारांपासून तुम्हाला वाचवू शकतात.

1 आवळा
आवळ्याचा वापर आयुर्वेदिक तज्ज्ञांकडून शतकांपासून रोगांवर उपचार करण्यासाठी केला जात आहे. हे छोटे हिरवे फळ व्हिटॅमिन सी च्या सर्वात चांगल्या स्त्रोतांपैकी एक आहे. एका आवळ्यात संत्र्याच्या तुलनेत जवळपास 20 पट जास्त व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी एक शक्तीशाली अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते. मज्जासंस्था, प्रतिकारशक्ती आणि त्वचेसाठी लाभदायक आहे.

2 संत्रे
एका मध्यम आकाराच्या संत्र्यात (100 ग्रॅम) 53।2 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. सर्दी, इतर अ‍ॅलर्जीने पीडित व्यक्तींसाठी संत्रे चांगले असते. हे फळ कोलेजनचे उत्पादन वाढवते.

3 शिमला मिरची
शिमला मिरचीत कोणत्याही आंबट फळापेक्षा जास्त व्हिटॅमिन सीची मात्रा असते. यातील बीटा कॅरोटीन, खनिज आणि व्हिटॅमिनमुळे प्रतिकारशक्ती वाढते. ती डोळ्यांसाठी चांगली असून तणाव कमी होतो.

4 लिंबू
लिंबू व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडेंटच्या सर्वात जास्त उपलब्ध स्त्रोतांपैकी एक आहे. हे प्रतिकारशक्ती मजबूत करते. अँटीऑक्सिडेंटमुळे पेशींचे रक्षण होते. यामध्ये थियामिन, रायबोफ्लेविन, विटामिन बी -6, पँटोथेनिक अ‍ॅसिड, कॉपर आणि मँगेनीज सुद्धा असते.

5 अननस
अननस पचन आणि सूजच्या समस्येवर शतकांपासून वापरले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि मँगेनीज उच्च मात्रेत असते. कमी कॅलरी आणि फायबर तसेच ब्रोमलेनने समृद्ध आहे. याच्या सेवनाने वायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.