Coronavirus In India : 74 % रूग्ण फक्त 4 राज्यात, 3 दिवसात वाढले 10 हजार ‘कोरोना’बाधित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना रूग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे. रुग्णांची संख्या ७० हजारच्या पुढे गेली आहे. नवीन प्रकरणांपैकी ७४.५० टक्के प्रकरणे केवळ चार राज्यांतील आहेत. गेल्या तीन दिवसांत १० हजाराहून अधिक रुग्ण वेगवेगळ्या राज्यात आढळले आहेत. पण पहिली दहा हजार प्रकरणे येण्यास ७५ दिवस लागले होते. मंगळवारी तिसऱ्यांदा एकाच दिवसात सर्वात जास्त ३६०४ संक्रमित आढळले.

एकट्या महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि दिल्लीत २६८५ रुग्ण आढळले आहेत.