कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतात 24 तासात कोरोनाच्या (corona in india) 91,702 नवीन केस समोर आल्या आहेत. हा लागोपाठ चौथा दिवस आहे जेव्हा कोरोनाच्या (corona in india) नवीन प्रकरणांची संख्या 1 लाखाच्या खाली राहीली आहे. यासोबतच देशात एकुण पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या 2,92,74,823 झाली आहे. मागील 24 तासांच्या दरम्यान कोरोनाने 3,403 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यानंतर एकुण मृतांची संख्या 3,63,079 झाली आहे. एकीकडे कोरोनाची नवीन प्रकरणे कमी होत आहेत तर दुसरीकडे महामारीमुळे होणारे आकडे पुन्हा एकदा वाढले आहेत.

यापूर्वी गुरुवारी बिहारच्या आरोग्य विभागाने अचानक कोरोनाने होणार्‍या मृतांच्या संख्येत वाढ केली होती.
यामुळे गुरुवारी 6 हजारपेक्षा जास्त मृत्यू नोंदले गले होते.
परंतु त्यापूर्वी रोज जारी होणारे मृतांचे आकडे 2000 च्या जवळपास होते.
अशावेळी आज मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे.

परमबीर सिंह यांच्याविरूध्द आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल, जाणून घ्या प्रकरण

गुरुवारी 1,34,580 कोरोना रूग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
ज्यानंतर देशात कोरोनावर मात करणार्‍या लोकांची एकुण संख्या 2,77,90,073 झाली आहे. सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांची एकुण संख्या 11,21,671 आहे.

दिल्लीत मागील 24 तासात कोरोनाची 305 नवीन प्रकरणे समोर आली आहेत तर 44 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्ली सरकारने राज्यात 9वी आणि 11वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

उत्तर प्रदेशात आज कोरोनाचे 642 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.
मागील 24 तासात 23 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना महामारीमुळे यावर्षी सुद्धा ओडिसाच्या पुरीमध्ये जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेवर प्रतिबंध जारी राहणार आहे.

Pune Unlock | पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी तर दुकाने, हॉटेलची वेळ वाढवली – अजित पवारांनी दिली माहिती

Ajit Pawar | पुणेकरांना दिलासा तर पिंपरी चिंचवडकरांची निराशा, सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल

CoWIN पोर्टल पूर्णपणे सुरक्षित, केंद्राने म्हटले – ‘हॅक झाला नाही 15 कोटी भारतीयांचा डेटा’

1 वर्षात 60% पर्यंत रिटर्न देईल ही स्कीम, तुम्ही सुद्धा लावू शकता येथे पैसे; जाणून घ्या कसे?

कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

Web Title :  corona in india daily updates covid 19 deaths in india delhi up corona cases