Corona in India : कोरोना संकटाचा कहर सुरूच ! 24 तासात आढळले 38 हजार नवीन रूग्ण, 624 संक्रमितांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची दुसरी लाट थोडी कमजोर झाली असली तरी अजून संपलेली नाही. दररोज सुमारे 40 हजार नवीन लोक कोरोनाने (Corona) संक्रमित होत आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health) जारी आकड्यांनुसार, मागील 24 तासात 38,792 नवीन कोरोना केस आल्या आणि 624 संक्रमितांचा जीव गेला. तर मागील 24 तासात 41,000 लोक कोरोनातून बरे झाले, म्हणजे काल 2832 अ‍ॅक्टिव्ह केस कमी झाल्या.

कोरोना संसर्गाची एकुण प्रकरणे
कोरोना अ‍ॅक्टिव्ह केस चार लाखापेक्षा जास्त आहेत. सध्या 4 लाख 29 हजार 946 लोक कोरोना संक्रमित आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत एकुण 4 लाख 11 हजार 408 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण 3 कोटी 1 लाख 4 हजार लोक बरे झाले आहेत. महामारीच्या सुरूवातीपासून आतापर्यंत एकुण 3 कोटी 9 लाख 46 हजार लोक संक्रमित झाले आहेत.

38 कोटीपेक्षा जास्त व्हॅक्सीनचे डोस दिल्याचा दावा
आरोग्य मंत्रालयानुसार, 13 जुलैपर्यंत देशभरात 38 कोटी 76 लाख कोरोना व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत. काल 37 लाख 14 हजार डोस देण्यात आले. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) नुसार, आतापर्यंत 43 कोटी 59 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या. काल सुमारे 19.15 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले, ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्केपेक्षा कमी आहे. देशात कोरोनाने मृत्यूदर 1.33 टक्के आहे तर रिकव्हरी रेट 97 टक्केपेक्षा जास्त आहे.

राज्यांमधील कोरोना स्थिती

* महाराष्ट्र
नवीन प्रकरणे 7243, मृत्यू 196

* आंध्र प्रदेश
नवीन प्रकरणे 2,567, मृत्यू 18

Web Titel :- Corona in India | india coronavirus cases today 14 july 2021 covid news update cases deaths second wave

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ