Corona in Maharashtra | धोका वाढतोय! राज्यात गेल्या 24 तासात 2813 रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या 10 हजार पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत (Corona in Maharashtra) मोठी वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हाच आकडा दोन हजारांच्या वर गेला आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णांच्या (Corona in Maharashtra) संख्येने मागील दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. गुरुवारी (दि.9) राज्यात तब्बल 2 हजार 813 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1702 रुग्णांची नोंद झाली असून मुंबईने (Mumbai) राज्याची चिंता वाढवली आहे.
राज्यात आज एकूण 1047 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत 77 लाख 42 हजार 190 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.98 टक्के इतके झाले आहे. राज्यात आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर (Fatality Rate) 1.87 टक्के इतका झाला आहे.
सक्रिय रुग्णसंख्या वाढली
राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या (Active Patient) देखील वाढली आहे. राज्यात आज एकूण 11 हजार 571 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक मुंबईत 7998 इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल ठाण्याचा क्रमांक लागतो. ठाण्यात 1984 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
Maharashtra reports 2813 new #COVID19 cases, 1047 recoveries and one death in the last 24 hours. pic.twitter.com/2Alr6Jg48w
— ANI (@ANI) June 9, 2022
Web Title :- Corona in Maharashtra 2813 corona patients registered and 1047 discharge in the state
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Snehalaya Balbhavan HSC Result | यंदाही स्नेहालय मधील बालकांचा बारावीचा निकाल 100 टक्के
Kisan Vikas Patra | 1000 रुपयांपासून करू शकता बचतीला सुरुवात, इतक्या दिवसात डबल होतील पैसे