Corona in Maharashtra | सावधान ! राज्यात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा ‘उद्रेक’?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्रात कोरोनाची (Corona in Maharashtra) दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. याच दरम्यान राज्यात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. राज्यात गणेशोत्सवानंतर (Ganesh Festival) कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची (Corona in Maharashtra) शक्यता आरोग्य अधिकाऱ्यांनी (Health officers) व्यक्त केली आहे. केरळमध्ये ज्या प्रकारे ओणम सणानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. तसाच प्रकार महाराष्ट्रात घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे ही भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोना वेगाने पसरण्याची भीती
देशातील अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक उत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याचे यापूर्वी पहायला मिळाले आहे. केरळमधील ओणम सणानंतर (Onam festival) रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवर साजरा होत असून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करत असल्याचे पहायला मिळत आहे. बहुतांश नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात गणेशोत्सवानंतर कोरोनाचा फैलाव वेगाने पसरू शकतो अशी भीती राज्याचे सर्व्हेलन्स अधिकारी डॉ. प्रदीप आवटे (Surveillance Officer Dr. Pradeep Awate) यांनी व्यक्त केली आहे.

 

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

गणेशोत्सवाच्या काळात जर कोरोना नियमांचे (Corona rules) तंतोतंत पालन केले, तर राज्यात येणारी कोरोनाची तीसरी लाट रोखता येऊ शकते, असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गणेश मंडळांनी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांच्या सोशल डिस्टन्सिंग (social distance), सॅनिटायजेशनची काळजी घेणं, मास्कशिवाय प्रवेश देणं ही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारला कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाची केंद्र वाढवणे आणि त्याचबरोबर टेस्ट आणि औषध पुरवठा यांची सोय करणं गरजेचं असल्याचा सल्लाही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Web Titel :- Corona in Maharashtra | corona patients may rise post ganesh festival fear health officers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 234 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 218 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात मेडिकल दुकानात चोरी, चोरट्यांचा 2 मिनीटात लाखो रुपयांवर डल्ला (व्हिडीओ)