Corona in Maharashtra | ‘महाराष्ट्रात कोरोनाची चौथी लाट येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Corona in Maharashtra | मागील तीन वर्ष राज्य कोरोनाच्या (Corona) विळख्यात अडकला होता. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान सध्या काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. काल राज्यात 326 नव्या रूग्णांची नोंद झालीय. त्याचबरोबर ओमायक्रॉनच्या BA.5 (Omicron BA.5) चंही एक प्रकरण समोर आलंय. हे पाहता महाराष्ट्रात कोरोनाची (Corona in Maharashtra) चोथी लाट येणार का? (Corona 4th Wave) असा सवाल देखील उपस्थित होतो आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

”कोरोनाची परिस्थिती गंभीर नाही. एकंदरीत सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona Preventive Vaccination) चांगला परिणाम दिसून येत आहे. कोरोनाच्या रूग्णांची नोंद होत आहे, कारण लोकं गर्दी करत आहेत, मेळावे भरतायत तसेच राजकीय कार्यक्रम होत असून इथे लोकं एकमेंकांना भेटतायत. परंतु, अपेक्षेप्रमाणे रूग्णसंख्येत वाढ होत नाहीये.” असं राजेश टोपे म्हणाले. (Corona in Maharashtra)

”कोरोनाच्या रूग्णांची नोंद पाहता काळजी करण्याचे कारण नाहीये. कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. राज्यात चौथ्या लाटेची शक्यता वाटत नाही.” असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

Web Title : Corona in Maharashtra | health minister rajesh tope speaks about forth wave of corona in nagpur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर