Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई मध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या (Corona in Mumbai) संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुंबई महानगरपालिकेतील (BMC) सुमारे 6 हजार 900 कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाले होते. यामध्ये 100 पेक्षा अधित जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. दुसऱ्या लाटेनंतर मुंबई तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून मुंबईत नवीन रुग्णांची संख्या (Corona in Mumbai) झपाट्याने वाढत आहे. यामध्ये महापालिका कर्मचारी (BMC Employee) व अधिकारी (Officers) मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधीत होत आहेत.

मुंबईत कोरोनाच्या (Corona in Mumbai) तिसऱ्या लाटेत 17 डिसेंबरपासून आतापर्यंत 172 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे. मुंबई महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्यासह नगरसेवक (Corporator) व अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

मुंबई महापालिकेमध्ये मार्च 2020 पासून आतापर्यंत 7 हजारापेक्षा जास्त कर्मचारी अधिकारी यांना कोरोनाची लागण (Corona Infection) झाली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कामगारांसह वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठांमध्ये उपायुक्त पदावरील चार अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. तसेच महापालिका हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी देखील बाधित झाले आहेत.

Web Title : Corona in Mumbai | corona to 172 officers and employees of mumbai municipal corporation BMC

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी