Corona in Mumbai | दिलासादायक ! मुंबईत ‘कोरोना’ची लाट ओसरतेय ?, आठवड्याभरात चित्र बदललं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने (Corona Third Wave) मुंबईकरांची (Corona in Mumbai) चिंता वाढवली होती. मात्र आता मुंबईतील कोरोना रुग्णांची (Corona in Mumbai) संख्या कमी होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख उतरला आहे. शनिवारी मुंबईत 10 हजार 661 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी 2 ते 3 हजार रुग्णांची संख्या घटली आहे.

 

मुंबईत नियंत्रणात आलेली कोरोनाची (Corona in Mumbai) लाट डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा झपाट्याने वाढू लागली होती. मागील 15 दिवसांतील आकडेवारी लक्षात घेतली तर रुग्णांचा आलेख चढताच राहिला आहे. 1 डिसेंबर रोजी 100 रुग्ण संख्या होती ती 7 जानेवारीला 22 हजारापर्यंत पोहोचली. 12 जानेवारीला 16 हजार रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर 13 ते 15 या कालावधीत पुन्हा रुग्णाची संख्या कमी झाली. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 656 रुग्ण कमी झाले.

 

मुंबईतील रुग्णालयातील 80 टक्के खाटा रिक्त आहेत. शनिवारी आढळलेल्या फक्त 722 रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी 111 रुग्णांना ऑक्सिजनची (Oxygen) गरज भासली. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी 2650 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 91 टक्के आहे. मंगळवारी 54 हजार 558 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

अशी वाढली रुग्णांची संख्या

6 जानेवारी – 20,681

7 जानेवारी – 20,971

8 जानेवारी – 20, 318

9 जानेवारी – 19,474

 

रूग्णांचा उतरता आलेख

10 जानेवारी – 13,648
11 जानेवारी – 11,674
12 जानेवारी – 16,420
13 जानेवारी – 13,702
14 जानेवारी – 11,317
15 जानेवारी – 10,661

 

Web Title :- Corona in Mumbai | coronavirus mumbai city reported over 10000 covid 19 new cases figers are come low in week

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा