Corona in Mumbai | थोडा दिलासा ! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 11,647 रुग्णांची नोंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईमध्ये कोरोना (Corona in Mumbai) आणि ओमायक्रॉनच्या (Omycron) रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली होती. पण आता मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशीही दिलासा मिळाला आहे. आज दुसऱ्यादिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज मुंबई शहरात (Corona in Mumbai) 11 हजर 647 रुग्ण आढळले आहे. मागील पाच दिवसातली ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे.

 

मुंबईत गेल्या 24 तासात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्य़ंत मुंबईत 16 हजार 413 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे 1 लाख 523 सक्रिय रुग्ण (Active Patient) आहेत. आज 14 हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, मुंबईचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 87 टक्के नोंदवण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात मुंबईत 20 हजारांच्या पुढे नवीन रुग्ण आढळून आले होते. मात्र, दोन दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.(Corona in Mumbai)

 

मागील दोन दिवसांत शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 30 ते 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. काही दिवसांपूर्वी दर दिवशी 20 ते 25 रुग्ण संख्या आढळून येत होती. तीच संख्या आता 11,647 वर येऊन पोहचली आहे. शहरातील 80 टक्के हॉस्पिटलमधील बेड रिकामे आहेत. रुग्ण संख्या कमी होत असल्याने नागरिकांसह प्रशासनाने काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 

Web Title :- Corona in Mumbai | mumbai corona reports 11647 fresh cases 2 deaths today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Saving & Investment Tips | सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खुप उपयोगी आहेत ‘या’ 7 टिप्स, लाभ घेण्यासाठी जाणून घ्या

 

Precision Dose in Pune | पुणे जिल्ह्यात 2 हजार 500 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला ‘प्रिक्रॉशन डोस’