Corona in Mumbai | मुंबईकरांनो सावधान! आज 19,474 नवीन रुग्णांची नोंद, ओमायक्रॉनचे 40 नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील कोरोनाबाधितांच्या (Corona in Mumbai) संख्येत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. आज मुंबईत 19 हजार 474 नवे रुग्ण (Corona in Mumbai) आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध (Strict Restrictions) लागू केले आहेत.

सध्या मुंबईमध्ये (Corona in Mumbai) 1 लाख 17 हजार 437 रुग्ण सक्रीय (Active Patient) आहेत. तर आज 7 मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय 8 हजार 063 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 78 हजार 119 वर पोहचली आहे. दरम्यान बरे झालेल्या रुग्णांचा दर 85 टक्क्यांवर गेला आहे.

दरम्यान, राज्यात आज तब्बल 44 हजार 388 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 207 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झाली आहे. तर मुंबईत 40 रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत मुंबईत 606 रुग्ण आढळून आले आहेत. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

 

 

 

Web Title :- Corona in Mumbai | mumbai reports 19 474 new covid 19 cases and 7 death today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Omicron Covid Variant | राज्यात आज ओमायक्रॉनचे 207 नवीन रुग्ण रुग्ण, पुणे जिल्ह्यात 37 रुग्ण

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा उद्रेक!, गेल्या 24 तासात 44 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Multibagger Penny Stock | दोन वर्षात 1 लाखाचे झाले 50 लाख रुपये, प्रचंड रिटर्न देतोय ‘हा’ ‘पेनी स्टॉक’

 

Eknath Khadse Vs Girish Mahajan | ‘गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल’ – खडसे