COVID-19 : शिवसेना भवनातील आणखी 3 जणांना ‘कोरोना’ची लागण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशात कुष्णकुंजवर कोरोना पोहोचल्यानंतर आता सेना भवनात देखील कोरोना पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात काम पाहणाऱ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळल्यानंतर सेनाभवनात फवारणीकरून ते सील करण्यात आलं होतं. मात्र, तरीही सेना भवनाभोवती कोरोना विळखा वाढत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 19 जूनला सेना भवनात गेले होते. तिथे कोरोना झालेले तीनही जण उपस्थित होते. एवढेच नाही तर त्यावेळी दिवाकर रावते, संजय राऊत, किशोरी पेडणेकर, विशाखा राऊत हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे या सर्वांची कोरोना चाचणी करवी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजमध्ये कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. राज ठाकरेंच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आसल्याचे सांगण्यात येत आहे. खरंतर यापूर्वी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने आता हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले आहेत.