Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 19148 नवे पॉझिटिव्ह तर 434 जणांचा बळी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशातील कोरोना प्रकरणे 6 लाखांच्या पुढे गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या अपडेटनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 4 हजार 641 आहे, ज्यामध्ये 17 हजार 834 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संसर्गातून आतापर्यंत 3 लाख 60 हजार रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 2 लाख 27 हजार आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 19 हजार 148 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 434 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार (आयसीएमआर) 1 जुलैपर्यंत एकूण 90 लाख 56 हजार 173 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 29 हजार 588 नमुन्यांची चाचणी काल घेण्यात आली आहे.

महाराष्ट्र – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 80 हजार 298 आहे, त्यामध्ये 8 हजार 53 लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत 93 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत, सक्रिय प्रकरणांची संख्या 79 हजारांहून अधिक आहे.

तामिळनाडू – कोरोना प्रकरणात महाराष्ट्रानंतर तामिळनाडूचा क्रमांक येतो. येथे एकूण रुग्णांची संख्या 94 हजारांवर गेली आहे, ज्यामध्ये 1264 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 52 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. सक्रिय प्रकरणांची संख्या सुमारे 40 हजार आहे.

दिल्ली – देशाच्या राजधानीत कोरोना संसर्गाची गती थोडीशी कमी झाली आहे. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या जवळपास 90 हजार आहे, ज्यामध्ये 2803 लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत सुमारे 60 हजार लोक बरे झाले आहेत, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 27 हजारांपेक्षा जास्त आहे.

गुजरात – राज्यात कोरोना संसर्गाचा वेग थांबला आहे. एकूण रुग्णांची संख्या 33 हजार 232 आहे, ज्यामध्ये 1867 लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये 24 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 7335 आहे.

उत्तर प्रदेश – गेल्या काही दिवसांत वेगाने राज्यात कोरोनाचे नवीन प्रकरण समोर आले आहेत. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 24 हजाराहून अधिक आहे, ज्यात 718 लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत 16 हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 6709 आहे.