पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ संक्रमितांचा आकडा 3 हजार पार, आज 127 नवीन रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू

पिंपरी/ पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधिताची संख्या वाढत असून मंगळवारी कोरोना बाधितांचा आकडा तीन हजाराच्या वर गेला आहे. आज या महामारीचे 127 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 7 रुग्ण पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील आहेत. यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 3029 एवढा झाला आहे. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादयाक म्हणजे आज दिवसभरात 145 रुग्णांची दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3029 इतकी झाली असून यापैकी 1862 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 47 जणांना आपले प्राण गमवावा लागला आहेत. याव्यतिरिक्त पिंपरी चिंचवडमध्ये उपचार घेणारे पुणे आणि परिसरातील 30 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 175 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात आढळून आलेल्या 127 रुग्णांमध्ये 42 पुरुष आणि 85 महिलांचा समवेश आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज एकूण 127 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 7 रुग्ण हे हद्दी बाहेरील आहेत. यामध्ये पुणे, बोपोडी, सासवड, देहूगांव, बवाधन येथील 3 महिलांसह 7 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांच्यासह हद्दीबाहेरील 68 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये 4 रुग्ण पिंपरी चिंचवड हद्दीतील आहेत तर 2 जण हद्दी बाहेरील आहे. चिंचवड येथील आण्णासाहेब मगर येथील 35 वर्षीय युवक, आणि चिंचवड येथील इंदिरानगर येथील 75 वर्षीय वृद्ध व्यक्ती तसेच पिंपरी येथील रुग्णालयात दाखल असलेले खडकी बाजार येथील 59 वर्षीय वृद्ध आणि मुंबईतील मुलुंड येथील 58 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, शहरातील रुग्णालयामध्ये 1116 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर पुण्यातील रुग्णालयात पिंपरी चिंचवडमधील चार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.