Kumar Sanu : गायक कुमार सानू यांना ‘कोरोना’ची लागण, घरातच झाले क्वारंटाईन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड मधील प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार सानू यांना कोरोना बाधा झाली आहे. यासंदर्भात त्यांचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी माहिती दिली आहे. बॉलिवूडमध्ये दर्दभरे गाणे आणि कुमार सानू यांचे एक समीरकरण बनले आहे. त्यामुळे कुमार सानू यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

९० च्या दशकात बॉलिवूमध्ये प्रदर्शित झालेल्या दिलवाले या चित्रपटात पार्श्वगायक म्हणून कुमार सानू यांनी काम केलं. त्यातील सर्वच गाण्यांना चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं होते. तेव्हापासून दर्दभरा गायक असे सानू यांना संबोधलं जावू लागलं. गुरुवारी सकाळी कुमार सानू दुबईच्या मार्गे अमेरिकेला जाण्यास निघाले होते. त्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्यात येते. त्या तपासणीमध्ये त्यांचा अहवाल सकारात्मक आल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे त्यांचा अमेरिका दौरा रद्द करण्यात आला. मुंबई महापालिकेने त्यांना घरी विलगीकरणात राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्यांच्या मॅनेजरने प्रसार माध्यमांना बोलताना दिली.

कुमार सानू यांची पत्नी सलोनी आणि दोन मुली सुना आणि एन हे लॉस अँजल्स शहरात राहतात. ते प्रत्येक महिन्याला त्यांना भेटण्यासाठी तेथे जात असत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून त्यांना अमेरिकेत जायला मिळाले नाही. त्यानंतर ते या महिन्यात जाण्यास निघाले होते, पण कोरोनाची लागण झाल्याने त्यांना हा दौरा रद्द करावा लागला आहे.

कुमार सानू यांनी समाज माध्यमात कोरोना झाल्याची पोस्ट शेअर केली आहे. तद्वतच त्यांच्या चाहत्यांनी लवकर बरे व्हा अशी प्रार्थना केली आहे.