धक्कादायक ! सलून चालवणार्‍या महिलेला ‘कोरोना’ची लागण

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यभरात कोरोनाचा कहर वाढला असून अनेकठिकाणी रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच सावंगी येथील कोरोनाबाधित महिलेच्या घरातील तरुणीचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. महिलेला सावंगी येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. महिलेचे केशकर्तनालयाचे दुकान आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेली महिला रुग्ण महिलेची नणंद आहे. ती भावासह सावंगी परिसरात सलून चालवीत आहे. सलूनमध्ये सावंगीच्या रुग्णालयातील डॉक्टर कटिंग करण्यास येत असल्याने तर्कवितर्कांना सध्या शहरात उधाण आले आहे. दरम्यान, आर्वी शहरात अकोल्याहून माहेरी आलेली 24 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. ही महिला एक महिन्याच्या बाळाला घेऊन 24 मे रोजी अकोला येथून आर्वी येथे आली होती. तिला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. तिच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. याचा अहवाल आज प्राप्त झाला, यामध्ये ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. वर्ध्यातील एकूण रुग्ण संख्या आता 18 वर पोहचली आहे.