आश्रूंमधून देखील पसरू शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं संक्रमण, स्टडीमध्ये दावा

बंगळुरू : कोरोना व्हायरसचा संसर्ग अश्रूंद्वारे सुद्धा पसरू शकतो. बेंगलोर मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आणि विक्टोरिया हॉस्पिटलच्या संयुक्त अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, अश्रूंमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचा आरएनए आढळू शकतो. आतापर्यंत आपल्या हे माहित होते की, कोरोना व्हायरस ड्रॉपलेट आणि ऐरोसोलनेच पसरतो.

संशोधकांनी 45 कोविड संक्रमित रूग्णांवर हे संशोधन केले. त्यांना एका रूग्णाच्या कंजेक्टिव्ह स्वॅबमध्ये कोविड व्हायरस आढळला, हा रूग्ण 24 वर्षीय युवक होता, लक्षणे नसलेला रूग्ण होता. या आधारावर संशोधक अंबिका रंगिया यांचे म्हणणे आहे की, कंजेक्टिव्ह स्वॅबमध्ये कोविड व्हायरस सापडण्याची शक्यता खुपच कमी आहे, पण डॉक्टरांनी संक्रमित रूग्णाच्या डोळ्यांची तपासणी करताना सावधानी बाळगली पाहिजे. अशाप्रकारे नेत्ररोगाच्या रूग्णांचा उपचार करतानाही डॉक्टरांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

पृष्ठभागावरून पसरू शकतो संसर्ग

संशोधकांना हे देखील आढळले की, डोळ्यातून निघालेला संक्रमित तरल पदार्थ कोणत्याही पृष्ठभागावर पडल्यास नकळत संसर्ग पसरू शकतो. ज्यामुळे एखाद्या निरोगी व्यक्तीला श्वासाद्वारे किंवा स्पर्शाद्वारे संसर्ग होऊ शकतो. जर एखादे व्यक्तीचे डोळे लाल दिसत असतील, चिकट द्रव निघत असेल, जळजळ होत असेल किंवा डोळ्यातून पाणी येत असेल तर संसर्ग लवकर पसरू शकातो. अशाच प्रकारचे निष्कर्ष चीनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून काढण्यात आले आहेत.