Coronavirus : ‘कोरोना’च्या संक्रमणापासून बचावासाठी ‘मास्क’ घालणं प्रभावशाली आहे की नाही ? तज्ञांनी सांगितलं, जाणून घ्या

नवी दिल्ला : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसमुळे आज जगभरात थैमान घातले आहे. अनेक लोकांना याचा संसर्ग झाला आहे. यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाल आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने सावधानी बाळगणे हाच यावरचा उपाय आहे. लंडन येथील एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी, त्याचे संक्रमणापासून स्वत:चा बाचाव करण्यासाठी आणि त्यावरील उपचार यावर अनेक दावे केले जात आहेत.

काही वैज्ञानिकांचे युक्तीवाद आणि त्यांचे अनुभव, त्याचे दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांमुळे लोकांची दिशाभूल होत आहे. कोरोनाबाबत करण्यात आलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे आणि कोरोनाचा संसर्ग कसा टाळायचा, कोणाला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे, संसर्ग झाल्यानंतर काय करायचे या सर्वांची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

वास्तविकता – चीनच्या संशोधकांकडून विषाणूच्या अनुवंशिकतेची माहिती घेतली जात आहे. वैज्ञानिकांना कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यास मदत झाली आहे. शास्त्रज्ञ त्या दृष्टीने वेगाने कामाला लागले आहेत. शास्त्रज्ञांकडून प्राण्यावर या लसचा प्रयोग केला आहे. प्राण्यांवर प्रयोग करण्यात आला असला तरी ही लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. शास्त्रज्ञांकडून या लसीचे दुष्परिणाम होतात का हे देखील पाहिले जात आहे.

दावा क्रमांक 1 – मास्क वापरणे प्रभावी नसल्याचा ‘दावा’
कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर करण्यास सांगितले जात आहे. मात्र, मास्क वापरल्याने कोरोनापासून संरक्षण होते हा दावा काहींनी खोडून काढला आहे. या विषाणूचा संसर्ग डोळ्यातून देखील होऊ शकतो. कोरोनाचा विषाणू डोळ्यावाटे शरिरात प्रवेश करु शकतो. केवळ अतिशय लहान कण ज्याला एरोसोल म्हणतात, ते मास्कचे सुरक्षा कवच भेदून शरिरात प्रवेश करु शकतात. मात्र, मास्कमुळे शिंकल्यावर किंवा खोकल्यावर बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या थेंबापासून बचाव करता येऊ शकतो. संक्रमण होण्याचे हेच मुख्य कारण आहे. एका अभ्यासानुसार मास्क वापरणारे लोक हे मास्क न वापरणाऱ्या लोकांपेक्षा 5 पाटपटीने सुरक्षित आहेत.

अगर एखाद्या व्यक्तिचा संपर्क कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी होण्याची शक्यता असेल तर मास्कमुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. एखाद्याला कोरोना असल्यास किंवा तो संक्रमीत होण्याची शक्यता असेल तर संबंधित व्यक्तीने मास्कचा वापर केल्यास त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. मास्कचा वापर आरोग्य सेवांमधील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी करणे अत्यावश्यक आहे. त्याच प्रमाणे घरामध्ये एखादा रुग्ण असल्यास त्याची देखभाल करताना मास्क वापरणे गरजेचे आहे. सद्य स्थितीमध्ये रुग्णाची देखभाल करणारी व्यक्ती आणी रुग्ण या दोघांना मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र, आवश्यक नसताना मास्क वापरणे गरजचे नाही.

दावा क्रमांक 2 – लहान वयाच्या व्यक्तींना धोका नाही
जे व्यक्ती वृद्ध किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही अशा व्यक्तींना कोरोना होण्याचा धोका नाही. मात्र जर व्यक्ती आजारी असेल आणि त्याला थोडा तापस असेल तर अशांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे अशा व्यक्ती आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस आणि प्रशासनच्या दृष्टीने संशयित आहेत. त्या व्यक्तीचा विषाणूच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले जातात. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो त्यांना संक्रमण होण्याचा धोका असतो. तरुणांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केल्यास आणि त्यांनी क्वारंटानच्या निर्देशांचे पालन केल्यास त्यांना संक्रमण होत नाही. परिणामी संक्रमण रोखण्यास मदत होईल.

दावा क्रमांक 3 – सर्दी आणि ताप हे धोकादायक आहे
जर एखादी व्यक्ती करोना संक्रमीत असेल आणि त्या व्यक्तीला सर्दी आणि ताप असेल तर त्याला काहीही होणार नाही. मात्र, अशा व्यक्तींना तात्काळ उपचाराची गरज असते. त्यांच्यावर योग्य उपचार केले नाहीतर याचे परिणाम घातक ठरू शकतात. ज्यावेळी संक्रमण वेगाने पसरते आणि संक्रमणाच्या घटना समोर येतात त्यावेळी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. नाहीतर मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता असते.

दावा क्रमांक 4 – यामुळे तणाव वाढणे हे अधिक धोकादायक
सर्व व्हायरस कालांतराने बदलतात. कोरोनाचा विषाणू देखील वेगळा नाही. एखादा विषाणू किती प्राणघात ठरू शकतो आणि तो मानवी शरिरावर किती वेगाने पोहचतो यावर अवलंबून आहे. विषाणूच्या संसर्गानंतर व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाण वाढते किंवा व्यक्ती आजारी पडतात असा विषाणू सर्वात धोकादायक असतो. कित्येक वेळा अशा विषाणूचा प्रभाव कमी होऊन त्याच्यापासून संसर्ग होण्याची शक्यता कमी होतो.

दावा क्रमांक 5 – संक्रमीत व्यक्तीच्या संपर्कात 10 मिनिटे राहिल्यास संसर्ग होतो
काही आरोग्य संस्थांना फ्ल्यूबाबत मार्गदर्शनक तत्वे दिली आहेत. जर एखादी व्यक्ती 10 मिनिटे शिंका किंवा खोकत असेल, तर अशा व्यक्तीपासून तुम्ही सहा फूट अंतरावर असाल तर आपण संक्रमीत होऊ शकता. परंतु असे ही होऊ शकते की आपण एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर आपल्याला लगेच संक्रमण होऊ शकते.