Corona Kavach Policy | कोरोना काळात मिळू शकतं 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर, ‘हे’ आहेत फायदे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Corona Kavach Policy | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. हे लक्षात घेऊन विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDA ने हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांना 31 मार्च 2022 पर्यंत नवीन कोरोना कवच पॉलिसी (Corona Kavach Policy) विकणे आणि जुनी रिन्यू करण्याचा आदेश दिला आहे. कोरोना कवच बाबत सविस्तर जाणून घेवूयात.
कोरोना कवच पॉलिसी (Corona Kavach Policy) चे फायदे
काय आहे पॉलिसी आणि कसे करते काम?
कोरोना कवच पॉलिसी केवळ कोरोना झाला तरच कव्हर देते. तिचा वापर कोरोनाच्या उपचारात येणार्या खर्चासाठी करू शकता. कोरोना कवच जनरल हेल्थ कव्हरपेक्षा खुप वेगळे आहे कारण यामध्ये केवळ कोरोनाचाच उपचार करू शकता. तर जनरल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये सर्व आजारांना कव्हर मिळते. सोबतच कोरोना पॉलिसीचा जो प्रीमियम असतो, तो जनरल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीपेक्षा खुप कमी असतो.
मिळतील हे लाभ
कोरोना कवच पॉलिसीमध्ये (Corona Kavach Policy) संक्रमित व्यक्तीला बेडचा चार्ज, नर्सिंग चार्ज, ब्लड टेस्ट (Blood Test), पीपीई किट (PPE Kit), ऑक्सीजन, आयसीयू (ICU) आणि डॉक्टरांची कन्सल्टेशन फी इत्यादीचे मोफत कव्हर दिले जाते. हे सर्व खर्च या पॉलिसीमध्ये कव्हर होतील.
याशिवाय हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर पुढील 30 दिवसांचा मेडिकल खर्च सुद्धा या पॉलिसीमध्ये सहभागी आहे. सोबतच रुग्णाचा उपचार घरातून केल्यास 14 दिवसांच्या देखरेखीसह औषधांचा खर्चसुद्धा दिला जातो.
मिळतील 5 लाख रुपयांपर्यंत, इतका असतो कालावधी
कोरोना कवच नावाच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.
ज्यासाठी इन्श्युरन्सची रक्कम 50 हजारापासून 5 लाखापर्यंत होऊ शकते.
तर, याची कालमर्यादा साडेतीन महिन्यापासून 6 आणि 9 महिन्यापर्यंत असू शकते.
कोरोना कवच एक शॉर्ट टर्म पॉलिसी आहे, या पॉलिसीचा लाभ 18 वर्षापासून 65 वर्षापर्यंतचे लोक घेऊ शकतात.
या पॉलिसीचा प्रीमियम म्हणून तुमच्या प्लाननुसार 500 ते 6 हजार रुपयांपर्यंत द्यावे लागतात, ज्यावर जीएसटी सुद्धा लागतो.
आयुर्वेदिक उपचारांचा सुद्धा समावेश
इतकेच नव्हे, या कवच पॉलिसीत रूग्णाच्या आयुर्वेदिक खर्चाचा सुद्धा समावेश केला आहे.
सोबतच हॉस्पिटलला जाणे आणि घरी येण्यासाठी अॅम्ब्युलन्सचा खर्च सुद्धा पॉलिसीतून मिळतो.
यासाठी पॉलिसीचे नियम आणि अटींनुसार किमान 24 तासांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती होणे आवश्यक आहे.
Web Title : Corona Kavach Policy | what is corona kavach policy online and benefits in marathi
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे