Corona in India : देशात कोरोनाने वाढवले टेन्शन ! 24 तासात 24,882 नव्या केस, 140 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात एकीकडे कोरोना व्हायरसच्या विरूद्ध लोकांना सुरक्षा देण्यासाठी व्हॅक्सीनेशनचे काम वेगाने सुरू आहे, तर पॉझिटिव्ह प्रकरणे वाढल्याने पुन्हा एकदा स्थिती चिंताजनक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, महाराष्ट्र आणि केरळात कोविड-19 ची सर्वात जास्त पॉझिटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत. याशिवाय, तमिळनाडु, पंजाब आणि दिल्लीमध्ये सुद्धा कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे.

भारतात कोरोना महामारीचे टेन्शन पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांचा ग्राफ वेगाने वर चढत आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे दोन लाखांच्या पुढे गेली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार भारतात मागील 24 तासात कोरोनाच्या 24,882 नव्या केस समोर आल्या. तर 140 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 19,957 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाद्वारे शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेले कोरोनाचे आकडे…

* देशात आतापर्यंतच्या कोरोना रूग्णांची एकुण संख्या – 1,13,33,728
* भारतात आतापर्यंत बरे झालेले रूग्ण – 1,09,73,260
* भारतात कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा – 1,58,446
* देशात सध्या एकुण अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या – 2,02,022

दिल्लीत कोरोना वाढत असल्याने जास्त टेस्टिंग
दिल्लीत मागील 24 तासात 72,031 सॅम्पलची तपासणी करण्यात आली. यापैकी 0.60 सॅम्पल पॉझिटिव्ह आढळले. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यानुसार नोव्हेंबरमध्ये दिल्लीत पॉझिटिव्हीटी 15% च्या जवळपास गेली होती. मागील दोन महिन्यांपासून पॉझिटिव्हीटी रेट 1% ने खाली आहे. जैन यांनी म्हटले की, आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. आम्ही टेस्टिंग वाढवल्या आहेत. देशात जेवढ्या टेस्ट होत आहेत त्याच्या 4 पट 5 पट जास्त टेस्ट दिल्लीत केल्या जात आहेत. दिल्लीत अन्य राज्यांच्यासारखी स्थिती नाही.