Lockdown 2.0 Guideline : ‘प्लंबर-मेकॅनिक-कारपेन्टर’ला सूट, सशर्त उघडणार IT कंपन्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या पार्ट टू संदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना काही सवलतीही दिल्या आहेत. तसेच काही उद्योगांना सूट देण्यात आली आहे. सेझमध्ये काम सुरू होऊ शकते. ई-कॉमर्स – कुरिअर सेवांना दिलासा मिळाला आहे. महत्त्वाच्या गोष्टी बनविणाऱ्या कारखाने देखील सुरु होऊ शकतात.

आवश्यक वस्तू व औषधांचे उत्पादन सुरूच राहिल असे सरकारने म्हटले आहे. काही विशिष्ट अटींसह ट्रकला येण्या-जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हॉटेल, लॉज खुले राहतील. इलेक्ट्रिक मेकॅनिक, प्लंबर, मोटर मेकॅनिक, कारपेंटर यांना परवानगी देण्यात आली आहे. 50 टक्के कर्मचारी असलेल्या आयटी कंपन्यांना कामासाठी मान्यता देण्यात आली आहे.

मार्गदर्शक तत्वानुसार, वैद्यकीय सेवांना अत्यावश्यक सेवांच्या अंतर्गत लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे. रुग्णालये, दवाखाने आणि औषधाची दुकाने खुली राहतील. शेतीशी संबंधित कामांनाही सूट देण्यात आली आहे. शेतमजूर काम करू शकतील. शेतीची साधने बनविणारी दुकानेही उघडली जातील. विमा कंपन्या बँकांसमवेत कार्यरत राहतील.

सरकारने अत्यावश्यक सेवांसाठी येण्या-जाण्याची परवानगी दिली असून बँक शाखा, एटीएम, टपाल सेवा, टपाल कार्यालये खुली राहतील. आयआरडीएआय आणि विमा कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. एपीएमसी संचलित सर्व मंडळ्या खुल्या असतील. मनरेगा अंतर्गत काम करण्यास परवानगी दिली गेली आहे. काही साइटवर काम सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

यासह मत्स्यपालनाशी संबंधित उपक्रमांना परवानगी देण्यात आली. दुधाची विक्री, संकलन, वितरण यांना परवानगी आहे. पेट्रोल पंप खुला राहतील. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डीटीएच, केबल, इंटरनेट सेवा सुरू राहतील. ग्रामीण भागात औद्योगिक उपक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. सेझमध्ये औद्योगिक उत्पादनास मान्यता देण्यात आली आहे.

सर्व प्रकारच्या परिवहन सेवांवर बंदी कायम राहील. याशिवाय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवांवरही बंदी कायम राहील. बसेस, रेल्वे, मेट्रो, ऑटो रिक्षा, टॅक्सी बंद राहतील. शाळा, शैक्षणिक संस्था, कोचिंग संस्था बंद राहतील. औद्योगिक कामांवर बंदी कायम राहील. चित्रपट, जिम, माल बंद राहील.

तथापि, 20 एप्रिलपासून निवडक ठिकाणी काही क्रियाकलापांना मान्यता दिली जाईल, तरीही सामाजिक अंतर कायम ठेवावे लागेल आणि कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी फेस-कव्हर करणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे दंड आकारला जाईल. जिल्ह्यात ये-जा, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात प्रवास करण्यावर बंदी आहे.