Coronavirus Lockdown : दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकमधील आणखी एक डॉक्टर ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   दिल्लीतील अजून एका मोहल्ला क्लिनिकमध्ये तैनात डॉक्टर कोरोना विषाणूने पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे डॉक्टर ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये तैनात होते. गेल्या अनेक दिवसांपासून क्लिनिकमधील रूग्णांवर उपचार करत होते. आता धोका लक्षात घेता त्या भागात नोटीस लावण्यात आली आहे. लोकांना घरातच क्वारंटाईन राहण्यास सांगितले जात आहे. असे सांगण्यात येत आहे की या डॉक्टरांकडून उपचार घेणार्‍या लोकांची संख्या 800 ते 1000 पर्यंत असू शकते. विशेष म्हणजे यापूर्वी देखील मौजपुरातील मोहल्ला क्लिनिकच्या डॉक्टरला कोरोना विषाणूची लागण झाल्याची घटना समोर आली होती.

12 ते 20 मार्च दरम्यान उपचार घेतलेले होतील सेल्फ-क्वारंटाईन

ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की, या मोहल्ला क्लिनिकमध्ये 12 ते 20 मार्च दरम्यान उपचार घेतलेल्या किंवा एखाद्याला चेकअपसाठी आणलेल्या सर्व लोकांनी आपल्या घरीच सेल्फ-क्वारंटाईन व्हावे. यावेळी कोणालाही काही अडचण असल्यास त्यांनी नोटीसमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. अलीकडेच दिल्लीतील मौजपूरमध्येही असेच एक प्रकरण समोर आले होते. जवळपास 800 लोकांना येथे अलग ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्येही ही संख्या 800 किंवा त्याहून अधिक असू शकते.

क्वारंटाईन मधून बाहेर आल्यावरही खबरदारी घ्यावी

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना बाधित लोकांनी बरे झाल्यानंतरही काही सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा लोकांनी घरात पाणी वाटणे, हात मिळवणे किंवा कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधणे टाळावे. खोकला, सर्दी किंवा शिंका आल्यावर त्यांनी वारंवार हात धुवावेत. तथापि, जर त्यांच्या शरीरात विषाणूची पातळी कमी असेल तर त्यांनी अन्न किंवा पाणी दिल्याने इतर लोकांना संक्रमित करू शकत नाहीत. तरीही, विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांनी शक्य ती खबरदारी घ्यायला हवी. तथापि, एकदा एखाद्या व्यक्तीचा संसर्ग पूर्णपणे बरा झाला की रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा संक्रमणापासून संरक्षण करण्यास तयार असते. त्याला पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता नसते.

You might also like