Lockdown : ‘कोरोना’ लॉकडाऊन दरम्यान ‘कॅश’ अडचण नाही, बँकांकडे तिप्पट जास्त रोख रक्कम

नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान बँकांना रोख रकमेची कमतरता अजिबात नाही. व्यवसायाशी निगडित व्यवहार कमी असल्याने शाखांमध्ये रोख रक्कम सामान्य दिवसांपेक्षा तीन पट जास्त असते तर काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त असते. त्याच वेळी बँकांबरोबरच एटीएममध्येही रोख रक्कम दीडपटहून अधिक आहे.

माहितीनुसार, नोटाबंदीच्या कालावधीपेक्षा एटीएम रिफिल करण्याची प्रणाली देखील चांगली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीशी संबंधित एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, बँकांच्या 14000 एटीएममध्ये सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम असे, परंतु आता सुमारे 3000 कोटी रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे.

एटीएममध्ये सुमारे 40 हजार कोटी रोख

देशातील सर्व एटीएममध्ये सुमारे 40 हजार कोटींची रोकड ठेवल्याचा अंदाज आहे. तांत्रिक अडचणींशिवाय कोणतेही एटीएम बंद केले जात नाही. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस सी.एच. वेंकटचालम यांनी सांगितले की, नेहमीपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्यांची संख्या बँकेत कमी आहे, अश्यात रोख तीनपट जास्त ठेवली आहे. ही रोकड एटीएमम रिफिलींग आणि लोकांना त्यांच्या गरजेनुसार पैसे देण्यासाठी वापरली जात आहे.

तसेच, रिझर्व्ह बॅंकेने बँकांना दीर्घकालीन रेपो ऑपरेशन्स अंतर्गत जमा केलेला निधी 30 दिवसांच्या आत वापरण्याचे निर्देश दिले आहेत. आरबीआयची इच्छा आहे की, बँकांनी हा निधी बाजारातील तरलतेसाठी वापरावा, नाही त्यांच्याकडे रोख रक्कम ठेवण्यासाठी. आरबीआयने बँकांना सांगितले की, जर एखाद्या बँकेने 30 दिवसांत दीर्घकालीन रेपो अंतर्गत प्राप्त निधी वापरली नाही तर त्यांच्यावरील व्याज दर पॉलिसी रेपो दरासह दोन टक्क्यांनी वाढेल.