आधिकऱ्याची गाडी थांबवल्याबद्दल होमगार्डला उठा -बश्या काढायला लावणारा पोलिस अधिकारी निलंबीत

पाटणा : वृत्तसंस्था – बिहारच्या अररियामध्ये होमगार्डला उठा -बश्या काढायला लावणाऱ्या एएसआयला निलंबित करण्यात आले आहे. नितीश सरकारने एएसआय गोविंद सिंग यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर नितीश सरकार यांनी चौकशीचे आदेश दिले.

खरेतर अररिया मध्ये कृषी अधिकारी मनोज कुमार यांना रस्त्यात थांबवणे या होमगार्डला चांगलेच महागात पडले. कृषी अधिकारी नाराज झाल्यामुळे ए एस आय गोविद सिंह यांनी होमगार्डला उठा -बश्या काढायला लावल्या होत्या . याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर आधिकऱ्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्या त्यामुळे सरकारने या एएसआय वर कारवाई करत निलंबन केले.

काय आहे प्रकरण ?

बिहारमध्ये बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ अररियाचा आहे, जिथे कृषी अधिकारी मनोज कुमार होमगार्ड जवानला फटकारत होते. शिक्षेला सामोरे जाणाऱ्या या होमगार्डचा दोष फक्त एवढाच आहे की लॉकडाऊनमध्ये कारने जाणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला रोखले. यानंतर या होमगार्डला ए एस आय आधिकऱ्याने उठा-बश्या काढायला लावल्या होत्या.

गाडी थांबवल्यानंतर कृषी अधिकारी मनोज कुमार इतके संतापले की त्यांची नाराजी लक्षात घेत पोलिस अधिकाऱ्याने जाहीरपणे होमगार्डला शिक्षा केली. या प्रकरणात कृषी अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले गेले आहे, तर एएसआय गोविंदसिंग यांना निलंबित करण्यात आले आहे.