Corona Lockdown : पुण्यात मास्क न घालता विनाकारण फिरणाऱ्यांना कोर्टाकडून शिक्षा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मास्क परिधान न करता फिरणाऱ्या दोघांना लष्कर न्यायालयाने प्रत्येकी 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सलाउद्दीन शमशुद्दीन मलिक (वय २६, रा.भीमपुरा,लष्कर) व नूर महंमद शेख (वय ४३,रा.नाना पेठ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे. मास्क न घालणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे.

मलिक आणि शेख दोघे जण लष्कर भागातून वाहनातून जात होते.नाकाबंदीत पोलिसांनी त्यांचे वाहन अडवले. त्यावेळी त्यांनी मास्क घातले नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांविरोधात संचारबंदीचा आदेशाचा भंग तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहायक निरीक्षक शिळमकर, राठोड, कडूकर, तांबोळी, होले, महामुलकर यांनी 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने मलिक आणि शेख यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.