Coronavirus : दिल्लीतील उपनिरीक्षकाचं कुटूंब कोरोना संक्रमित, पोलिस कॉलनीतील 3 ब्लॉक ‘सील’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या मॉडेल टाउन पोलिस कॉलनीचे तीन ब्लॉक सील करण्यात आले असून नॉर्थ-वेस्ट जिल्ह्याच्या डीएसपीनुसार ब्लॉक- जी, एच आणि आयला सील केले गेले. या कॉलनीत दिल्ली पोलिसांचे उपनिरीक्षक कुटुंबासमवेत राहतात. अलीकडे कुटुंबातील तीन सदस्यांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे.

नॉर्थ-वेस्ट जिल्ह्याचे डीएसपी म्हणाले की, उपनिरीक्षकाची पत्नी एसएनजीपी रुग्णालयात काम करते. प्रथम पत्नीला कोरोना झाला, नंतर उपनिरीक्षक आणि नंतर मुलाला. कुटुंबातील ३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर 3 ब्लॉक सील केले गेले. बुधवारी दिल्ली पोलिसांचेही दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते.

यादरम्यान दिल्लीत कोरोना संसर्गाची घटना दिल्लीत सलग दुसर्‍या दिवशी कमी झाली असून १३ एप्रिल रोजी दिल्लीत ३६५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती, तर १४ एप्रिलला ही संख्या ५१ आणि १५ एप्रिल रोजी म्हणजे बुधवारी फक्त १७ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. सलग दुसर्‍या दिवशी दिल्लीत कोरोना रुग्णांची घट म्हणजे चांगले संकेत आहेत.

मुंबईनंतर दिल्ली हे दुसरे शहर आहे जिथे कोरोना प्रकरणांची संख्या सर्वाधिक होती, परंतु त्यात जमातमधील लोकांची संख्या अधिक होती, ही आणखी एक बाब आहे. दिल्लीत कोरोनाच्या १५७८ रूग्णांमध्ये १०८० विशेष प्रकरणे आहेत. म्हणजेच जर मरकज नसता झाला तर दिल्लीत कोरोनाच्या प्रकरणांची संख्या ५०० पेक्षा कमी असती.