केंद्रीय मंत्र्यानं शेअर केला विमानातील ‘मास्क-हेल्मेट’ परिधान केलेल्या प्रवाशांचा फोटो, म्हणाले – ‘वेळनं आम्हाला बदललं’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – भारतासह जगभरातील देश कोरोना साथीच्या आजाराशी झुंज देत आहेत. कोरोना विषाणूमुळे सर्वांची जीवनशैली बदलली आहे. मास्क आणि संरक्षणात्मक गिअर्स आता आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी एक फोटो ट्विट केला आहे. विमानाच्या केबिनच्या या फोटोमध्ये, प्रवासी मास्क, हेल्मेट आणि संरक्षक गियरसह बसलेले दिसत आहे.

हरदीपसिंग पुरी यांनी ट्विट केले की, ‘लोक बदलले आहेत. हे कोणत्याही विज्ञान फिक्शन चित्रपटाचा सीन नाही, तर एअर इंडियाच्या सिंगापूर-मुंबई उड्डाणचे केबिन आहे. प्रवाश्यांनी आपले चेहरे शील्डने झाकले आहेत. प्रवासामध्ये संरक्षणात्मक गीअर्सचा वापर करणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. याबरोबरच पुरी यांनी अमेरिकन गीतकार बॉब डिलन यांचे प्रसिद्ध गाणे ‘द टाइम्स दे आर चेंजिंग’ ची लाईन लिहली आहे.

वास्तविक, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता, विमानात प्रवाशांच्या सामाजिक अंतरावर लक्ष दिले जात आहे. प्रत्येक स्तरावर, प्रवाशांच्या रिपोर्टिंगची वेळ 120 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे जेणेकरुन प्रवाश्याची संपूर्ण तपासणी होऊ शकेल. फ्लाइट क्रू सर्व प्रवाश्यांसाठी सेनिटायझर्सची व्यवस्था करीत आहेत. सर्व प्रवाशांना त्यांच्या सीटवर बसण्यापूर्वी सॅनिटायझर वापरण्याची आवश्यकता असेल.

एवढेच नव्हे तर प्रवाशांना प्रवासादरम्यान वैयक्तिक सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे आरोग्यासाठी आवश्यक वस्तू असणे आवश्यक असेल.